क्रिकेटपटू म्हणाला माझी मुलगी होणार 'सुपरस्टार', डान्सचा VIDEO VIRAL

क्रिकेटपटू म्हणाला माझी मुलगी होणार 'सुपरस्टार', डान्सचा VIDEO VIRAL

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी खेळत असून खेळाडूने सोशल मीडियावर मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या खासगी आयुष्यात अडचणी असल्या तरी त्यानं या सर्वांवर मात करत क्रिकेटच्या मैदानावर कामगिरी उंचावली आहे. पत्नी हसीन जहाँसोबतच्या वादामुळे त्याच्या मुलीपासूनही दुरावला आहे. मात्र तरीही त्याचं मुलीबरोबरचं नातं खूप छान आहे.

मोहम्मद शमी अधून मधून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत असतो. याआधी त्यानं मुलीचे फोटो आणि व्हिडिओ शेअऱ केले आहेत. नुकताच त्यानं मुलीचा भोजपुरी गाण्यावरचा डान्स असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये मोहम्मद शमीची मुलगी एका स्टोअरमध्ये 'शॉपिंग करा दो या पिझ्झा खिला दो' या लोकप्रिय भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसते.

सध्या मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत आहे. दरम्यान, शमीने पोस्ट केलेल्या व्हिडिओवर भारताचा गोलंदाज खलील अहमदने म्हटलं आहे की, शमीने त्याच्या मुलीकडून डान्स शिकायला हवा.

शमीच्या पत्नीने त्याच्यावर गेल्या वर्षी अनेक आरोप केले होते. यामध्ये शमीचे अफेअर असून त्यानं छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. तिने याप्रकरणी पोलिसांकडेही धाव घेतली आहे. शमीने याआधी त्याच्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पत्नीने त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही केले आहेत.

वाचा : 'पांड्या मी नेहमी तुझ्यासोबत', वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अभिनेत्री झाली भावूक

वाचा : क्रिकेट वाचवण्यासाठी अखेर ‘देव’ आला धावून, युवा खेळाडूंना दिला महत्त्वाचा सल्ला

SPECIAL REPORT: तळकोकणातील राजकीय शिमग्यात मुख्यमंत्र्यांची उडी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2019 11:39 AM IST

ताज्या बातम्या