मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /क्रुणाल पंड्याही आहे भाऊ हार्दिक इतकाच रोमॅंन्टिक, जाणून घ्या त्याची इमोशनल Love Story

क्रुणाल पंड्याही आहे भाऊ हार्दिक इतकाच रोमॅंन्टिक, जाणून घ्या त्याची इमोशनल Love Story

क्रुणाल पंड्यानं आपल्या कामगिरीद्वारे अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. जाणून घ्या त्याच्या खासगी आयुष्याबद्दल

क्रुणाल पंड्यानं आपल्या कामगिरीद्वारे अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. जाणून घ्या त्याच्या खासगी आयुष्याबद्दल

क्रुणाल पंड्यानं आपल्या कामगिरीद्वारे अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. जाणून घ्या त्याच्या खासगी आयुष्याबद्दल

नवी दिल्ली, 24 मार्च : भारतीय क्रिकेट टीमचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या याचा भाऊ कुणाल पंड्याचा आज तिसावा वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी क्रुणाल पंड्यानं भारतीय संघासाठी वनडे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. (Krunal Pandya Birthday)

वनडे करियरची शानदार सुरवात

क्रुणाल पंड्यानं इंग्लंडच्या विरुद्ध पुण्यात आपल्या वनडे इंटरनॅशनल करियरची सुरवात केली होती. कुणाल पंड्यानं आपली डेब्यू मॅच अविस्मरणीय बनवत बॅट आणि बोळाच्या माध्यमातून चमत्कार घडवला होता. (Indian cricketer krunal pandya love story)

हेही वाचा विराटच्या टीमला टक्कर द्यायला नवी 'टीम इंडिया' तयार, संधी कधी मिळणार?

31 बॉल्सवर केले 58 रन

क्रुणाल पंड्यानं आपल्या डेब्यू मॅचमध्ये बॅटिंग करत 31 बॉल्सवर 58 धावा काढल्या. यात 7 चौकार आणि 2 षटकार होते. याशिवाय बॉलिंग करतानाही क्रुणाल पंड्यानं एक विकेट घेतली.  (Love story of Krunal Pandya and Pankhudi)

रोमँटिक आहे प्रेमकथा

क्रुणाल पंड्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं झालं तर तो त्याचा भाऊ हार्दिक पंड्यासारखाच रोमँटिक आहे. क्रुणाल पंड्याचं लग्न 27 डिसेंबर 2017 रोजी पंखुरी शर्मासोबत झालं होतं. (Hardik Pandya brother Krunal love story)

हेही वाचा EXPLAINER : गब्बरचा एण्ड जवळ, शिखर धवनचं दोन फॉरमॅटमधलं करियर संपलं?

अशी झाली होती पहिली भेट

पंखुडी आणि क्रुणाल यांची पहिली भेट एका पार्टीमध्ये झाली होती. दोघांना एका कॉमन मित्रानं भेटवलं होतं. यानंतर दोघांची मैत्री झाली. मग प्रेम जुळलं. आयपीएलमध्येही अनेकदा पंखुडी आणि क्रुणाल आणि पंखुडीचे फोटोज व्हायरल झाले होते. शेवटी दोघांनी 27 डिसेंबर 2017 रोजी लग्न केलं.

First published:
top videos

    Tags: Hardik pandya, Krunal Pandya, Love story