मुंबई, 17 जानेवारी : भारताचा अनुभवी क्रिकेटर चेतेश्वर पुजारा हा आज त्याच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना खेळत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामना खेळवला जात असून या सामन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाकडून चेतेश्वर पुजाराला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
अरुण जेटली स्टेडियमवर आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा सामना पारपडत आहे. हा सामना चेतेश्वर पुजारासाठी खुपच खास असून त्याच्या शंभराव्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने माजी दिग्गज क्रिकेटर सुनील गावस्कर यांच्याकडून त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुजाराचे वडिल आणि पत्नी पूजा तसेच मुलगी उपस्थित होते.
चेतेश्वर पुजाराने याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “सुनील सर तुमच्याकडून ही कॅप मिळणे हा सन्मान आहे, तुमच्यासारख्या दिग्गजांनी मला प्रेरणा दिली. मला लहानपणी भारताकडून खेळायचे होते, पण 100 कसोटी सामने खेळेन असे कधीच वाटले नव्हते. माझ्यासाठी कसोटी क्रिकेट हे अंतिम स्वरूप आहे, ते जीवनाप्रमाणेच तुम्हाला आव्हान देते. सर्व तरुणांना, तुम्हा सर्वांना भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहित करतो. मी माझी पत्नी, माझे कुटुंब, बीसीसीआयमधील सर्वांचे आणि या प्रवासात मला साथ देणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो,” असे पुजारा म्हणाला.
A guard of honour and a warm welcome for @cheteshwar1 on his 1⃣0⃣0⃣th Test 😃👌#TeamIndia | #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/jZoY1mjctu
— BCCI (@BCCI) February 17, 2023
हे ही वाचा : IND VS AUS : आज बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना; ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला
भारताकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने आतापर्यंत 200 कसोटी सामने खेळले. तर त्याच्या पाठोपाठ राहुल द्रविड याने 163 आणि व्ही व्ही एस लक्ष्मण याने 134 सामने खेळले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket, Cricket news, India vs Australia, Test cricket