भारताच्या या क्रिकेटपटूकडं नाही मोबाइल, पत्नीच्या फोनवरून करतो कॉल

भारताच्या या क्रिकेटपटूकडं नाही मोबाइल, पत्नीच्या फोनवरून करतो कॉल

आता स्मार्टफोनच्या जगात एखाद्याकडे मोबाइल नाही म्हटलं तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

  • Share this:

हैदराबाद, 21 मार्च : आता स्मार्टफोनच्या जगात एखाद्याकडे मोबाइल नाही म्हटलं तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. पण टीम इंडियाच्या एका खेळाडूकडं त्याचा स्वत:चा मोबाइल नाही आणि हे खरं आहे. त्याला एखाद्याला फोन करायचा असेल तर तो पत्नीच्या फोनवरून बोलतो. याची माहिती हरभजन सिंगने एका चॅट शोमध्ये सांगितली होती.

चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा फलंदाज अंबाती रायडुकडे मोबाइल नाही. याचा खुलासा हरभजन सिंगने एका मुलाखतीत केला होता. यावेळी त्यानं अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. हरभजन सिंग म्हणाला होता की, रायडु असा खेळाडू आहे जो काय करत आहे ते समजत नाही. तो कधी फोन वापरत नाही. यावर रायडुनेही हसत उत्तर दिलं होतं की, माझ्याकडे मोबाइल नाही.

मोबाइल नसल्याचं रायडुनं सांगताच हरभजन सिंगने विचारलं होतं की, तु एकदा मला फोन केला होतास तो कोणाचा नंबर होता? यावर रायडुने त्यावेळी पत्नीच्या मोबाइलवरून फोन केल्याचं सांगितलं. जेव्हा कधी गरज असते तेव्हा पत्नीच्या मोबाइलवरून फोन करत असल्याचं त्यानं सांगितलं होतं.

हे वाचा : अनुष्काने कॅमेरा सुरु करताच विराटचे विचित्र हावभाव, सानिया मिर्झाने केली कमेंट

अंबाती रायडुवनं 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये निवड न झाल्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली होती. त्यानंतर रायडुने निर्णय मागे घेत पुन्हा घरेलू क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. यंदाच्या आयपीएल हंगामात खेळण्यासाठी त्यानं तयारीही सुरु केली आहे. वर्ल्ड कपआधी रायडुला चौथ्या क्रमांकावर दावेदार मानलं जात होतं. मात्र त्याची निवड संघात झाली नव्हती.

हे वाचा : टीम इंडियाच्या जादुगरची जादू पाहिलीत का? BCCI ने शेअर केला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2020 06:39 PM IST

ताज्या बातम्या