अजिंक्य रहाणेनं चिमुकलीचा फोटो शेअर करून सांगितलं नाव

भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनं त्याच्या चिमुकलीचा फोटो शेअर केला असून तिचं नावही सांगितलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 8, 2019 11:48 AM IST

अजिंक्य रहाणेनं चिमुकलीचा फोटो शेअर करून सांगितलं नाव

मुंबई, 08 नोव्हेंबर : भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने त्याच्या गोंडस मुलीचा फोटो शेअर केला आहे. अजिंक्यची पत्नी राधिकाने 5 ऑक्टोंबर रोजी मुलीला जन्म दिला. त्यानंतर आज एक महिन्याने अजिंक्यने मुलीचा फोटो शेअर करताना तिचं नावही सांगितलं आहे.

अजिंक्य रहाणेनं त्याच्या मुलीचं नाव आर्या ठेवलं आहे. फोटो शेअर करताना त्यावर आर्या अजिंक्य रहाणे असा कॅप्शन त्याने दिला आहे. आर्याचा जन्म झाला त्यावेळी अजिंक्य रहाणे विशाखापट्टणम इथं कसोटी मालिकेत खेळत होता. त्या सामन्यानंतर अजिंक्य पत्नी आणि मुलीला भेटला होता.

View this post on Instagram

Aarya Ajinkya Rahane ❤️

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

याआधी अजिंक्यने मुलीचा फोटो शेअर केला होता. मात्र, यामध्ये मुलीचा चेहरा दिसत नव्हता. पण आता त्याने चिमुकलीचा गोंडस फोटो शेअर केला आहे. चाहतेही तिचं कौतुक करत आहेत.

Loading...

View this post on Instagram

Hello ❤️

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

अजिंक्य रहाणे आणि राधिका लहानपणापासून मित्र होते. त्यांनी 26 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबईत लग्न केलं होतं. अजिंक्य रहाणेनं आपण बाप होणार असल्याची गुड न्यूज जुन महिन्यात दिली होती. तेव्हा त्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअऱ केले होते.

वकिलांनी महिला पोलिसावरही केला हल्ला, पाठलाग करून केली मारहाण, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 11:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...