द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, केएल राहुल संघाबाहेर

द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, केएल राहुल संघाबाहेर

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 12 सप्टेंबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधारपदी विराट कोहली कायम असून अजिंक्य राहणेकडे पुन्हा एकदा उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसंच नवख्या शुभमन गिलला सलामीवीर केलएल राहुलच्या जागी संधी देण्यात आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

सलामीला नवी जोडी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघानं चमकदार कामगिरी केली खरी, पण सलामीच्या जोडीकडून मात्र निराशा झाली. त्यामुळे आता आफ्रिकेविरुद्धच्या 3 कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल भारतीय डावाची सुरुवात करतील. या जोडीला सूर गवसल्यास आफ्रिकेला नमवणं भारतासाठी सोपं ठरणार आहे.

राहुलला का मिळाला डच्चू?

सलामीवीर म्हणून सातत्याने मिळालेल्या संधीचा केएल राहुल फायदा उठवू शकला नाही. राहुलने काही वेळा लक्षवेधी कामगिरी केली मात्र त्यामध्ये त्याला सातत्य राखता आलं नाही. त्यामुळे निवड समितीनं त्याला संघातून डच्चू दिला आहे. त्याच्या जागा संधी मिळालेल्या शुभमन गिलकडे आता भारतीय क्रीडा रसिकांचं लक्ष लागलं आहे.

आफ्रिकेविरुद्धच्या 3 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ -

विराट कोहली (कर्णधार)

मयांक अग्रवाल,

रोहित शर्मा,

चेतेश्वर पुजारा,

अजिंक्य रहाणे,

हनुमा विहारी

रिषभ पंत (विकेटकीपर)

रिद्धीमान साहा (विकेटकीपर)

आर. अश्विन

रवींद्र जाडेजा

कुलदीप यादव

मोहम्मद शामी

जसप्रित बुमराह

इशांत शर्मा,

शुभमन गिल

तुम्ही खात असलेल्या पाणीपुरीत गटाराचं पाणी तर नाही? धक्कादायक VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: IND VS SA
First Published: Sep 12, 2019 04:55 PM IST

ताज्या बातम्या