मुंबई, 18 जुलै : वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. त्यासाठी शुक्रवारी भारतीय संघाची निवड केली जाणार होती. मात्र आता ही तारिख आता पुढे ढकलण्यात आली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघ 3 एकदिवसीय सामने, 3 टी-20 आणि 3 कसोटी सामने खेळणार आहे. दरम्यान अजूनपर्यंत तारिख पुढे ढकलण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, निवड समितीनं कोणत्या अकरा खेळाडूंना संघात स्थान द्यावे हे ठरवले नाही आहे.
दरम्यान, यामुळं टी-20साठी वेस्ट इंडिजला रवाना होणाऱ्या संघात बदल होऊ शकतात. दरम्यान विराट कोहली, रोहित शर्मा, बुमराह या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. दरम्यान सलामीचा फलंदाज शिखर धवन दुखापतीमुळं वर्ल्ड कप खेळू शकला नव्हता. त्यामुळे त्याचे आणि विजय शंकरचे भवितव्य निवड समिती ठरवणार आहे.
वाचा- वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार विराट कोहली, मात्र 'या' नावांबाबत सस्पेन्स कायम
सैनी-अहमद यांना मिळू शकते संधी
जर निवड समितीनं विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विश्रांती दिल्यास नवदीप सैनी आणि खलील अहमद यांना संघात जागा मिळू शकते. तर, विकेटकिपिंगसाठी धोनीच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळू शकते.
वाचा- BCCIच्या अहवालात मोठा खुलासा, रोहित-विराट वादावर केले 'हे' भाष्य
धोनी वेस्ट इंडिज दौऱ्याला मुकणार
वेस्ट इंडीज दौऱ्यावर धोनी संघात नसेल. तो यापासून दूर राहणार असला तरी संघात होणाऱ्या बदलासाठी तो मदत करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी वेस्ट इंडीजला जाणार नाही. भारताच्या संघात धोनी 15 जणांमध्ये असेल पण तो अंतिम अकरामध्ये नसेल. त्याच्या जागी ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून संघात खेळण्याची शक्यता आहे.
असा असेल वेस्ट इंडिज दौरा
भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौऱा 3 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 टी-20 सामने, 3 वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होणार आहे. त्यानंतर 8 ऑगस्टपासून वनडे तर 22 ऑगस्टला पहिला कसोटी सामना सुरू होईल. या दौऱ्यासाठी 19 जुलै रोजी भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी या दौऱ्यावर जाणार नाही. तर शिखर धवन देखील उपलब्ध असणार नाही. त्याच्या जागी मयंक अग्रवालला संघात संधी मिळू शकते.
वाचा-BCCIचा विराट कोहलीला धक्का; प्रशिक्षक निवडीतून केले बाजूला!
VIDEO : प्रेयसीच्या घरी रंगेहात सापडला पती, मग काय पत्नीने धु-धु धुतले