श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आज होणार टीम इंडियाची निवड, ‘हे’ स्टार खेळाडू करणार कमबॅक

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आज होणार टीम इंडियाची निवड, ‘हे’ स्टार खेळाडू करणार कमबॅक

भारत आणि श्रीलंका यांच्यात मालिका 5 जानेवारीपासून आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध 14 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

  • Share this:

मूंबई, 23 डिसेंबर : वेस्ट इंडिजविरुद्ध टी -20 आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडिया 2020मध्ये पहिली मालिका श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर विराटसेना ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात येणार असून, त्यातील सर्वांचे लक्ष जसप्रीत बुमराह निवडवर असेल. या दोन्ही मालिकांसाठी बुमराहची निवड होऊ शकते अशा बातम्या आहेत. पाठीच्या दुखण्यामुळे बुमराह बर्‍याच दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात मालिका 5 जानेवारीपासून आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध 14 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

काही दिवसांआधी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आणि जसप्रीत बुमराह यांच्यात वाद झाला होता. राहुल द्रविडनं बुमराहला फिटनेस टेस्ट घेण्यास नकार दिला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी बुमराहला फ्रॅक्चर झाले होते. यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज बुमराह केवळ दक्षिण आफ्रिकेविरूद्धच नाही तर बांगलादेशविरूद्धही मालिकेत खेळू शकला नाही.

वाचा-क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, रोहित शर्मा घेणार क्रिकेटमधून ब्रेक!

बुमराह करणार कमबॅक!

बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 'दोन्ही मालिकेसाठी सोमवारी दुपारी दिल्लीत संघाची निवड केली जाईल. या दोन्ही मालिकेसाठी निवडक संघ निवडतील. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ही अखेरची निवड बैठक असेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

वाचा-एका क्षणात सुपरमॅनसारखा हवेत उडाला फलंदाज आणि घेतला कॅच! पाहा VIDEO

नवीन निवड समितीची घोषणाही होऊ शकेल

एमएसके प्रसाद आणि मध्य क्षेत्रचे साथीदार गगन खोडा यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळं नवीन वर्षाच्या सुरूवातीस नवीन मुख्य निवड समितीसह पॅनेल सदस्याचे नाव जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. जतिन परांजपे, सरनदीप सिंग आणि देवांग गांधी या समितीत कायम असतील. बुमराह चार महिन्यांनंतर ऑस्ट्रेलिया मालिकेतून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हार्दिक पांड्याही या मालिकेत पुनरागमन करू शकतो.

वाचा-विराटनं जिंकली सर्वांची मनं, अस्सल मराठी ट्वीट करत दिली शार्दुल ठाकूरला शाबासकी!

रोहित शर्माला देणार विश्रांती

रोहित शर्मा 2019मध्ये वर्षभर क्रिकेट खेळत आहे. टी-20, एकदिवसीय आणि कसोटी तिन्ही फॉरमॅटमध्ये रोहितनं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मात्र टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या बातमीनुसार, रोहित शर्मा 5 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी उपलब्ध राहणार नाही आहे. बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सध्या पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं भारतीय संघ तयारी करत आहे. त्यामुळं निवड समिती फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंनी विश्रांती देण्याचा विचार करणार नाही. मात्र रोहित शर्मा गेल्या वर्षभरापासून क्रिकेट खेळत आहे. त्यामुळं बोर्डच्या वतीनं श्रीलंका दौऱ्यात रोहितला विश्रांती दिली जाईल’.

वाचा-‘धोनीनं नाही तर आता पंतनं निवृत्ती घ्यावी’, मोक्याची क्षणी बाद झाला ऋषभ

असा आहे भारत-श्रीलंका दौरा

श्रीलंकाविरुद्ध भारतीय संघ तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका 5 जानेवारीपासून गुवाहाटी येथून सुरू होईल. त्यानंतर 7 जानेवारी रोजी इंदूरमध्ये दुसरा सामना होईल. तर तिसरा आणि शेवटचा सामना पुण्यात होणार आहे. त्यामुळं या दौऱ्यातून विश्रांती घेतल्यानंतर रोहित त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरोधात होणाऱ्या मालिकेत पुनरागमन करू शकतो. दुसरीकडे सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जखमी झालेला शिखर धवन फिट झाला आहे, त्यामुळं तो संघात पुनरागमन करू शकतो. तर, केएल राहुलची जागा संघात निश्चित झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2019 02:31 PM IST

ताज्या बातम्या