क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, भारत आशियाई कप खेळणार नाही ?

जर, भारत आशियाई स्पर्धा खेळला नाही त्याचा फटका आशियाई क्रिकेट काउंसिलल बसणार आहे.

News18 Lokmat | Updated On: May 29, 2019 08:58 PM IST

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, भारत आशियाई कप खेळणार नाही ?

दुबई, 29 मे : विश्वचषकाला केवळ काही तासांचा कालावधी उरला असताना, त्याआधीच आता आशियाई चषक 2020च्या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. आशियाई क्रिकेट काऊसलिंगच्या बैठकीत आशियाई स्पर्धेचे यंजमानपद पाकिस्तानला देण्यात आले आहे. त्यामुळं आता भारत आशियाई चषकात सामिल होणार नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. 15वा आशियाई चषक हा टी-20 फॉरमॅटमध्ये होणार आहे. त्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे.

पाकिस्तानात नाही जाणार भारतीय संघ ?

सिंगापूरमध्ये झालेल्या आशियाई क्रिकेट काउंसिलच्या बैठकीत पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद करण्याचे ठरले आहे. त्यामुळं भारत आशियाई स्पर्धेत खेळणार नसल्याच्या चर्चा सुरु आहेत. पाकिस्तान आणि भारत यांच्यात राजकिय संबंध चांगले नसल्यामुळं 26/11च्या हल्ल्यानंतर या दोन्ही संघांमध्ये एकही सामना झालेला नाही. दोन्ही संघांनी 2012मध्ये शेवटचा सामना खेळला होता.

दुसऱ्या देशात भारत खेळणार सामना

न्यु इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार आशियाई कपचे ठिकाण जर बदलले तर, बीसीसीआय भारतीय संघाला खेळण्यासाठी पाठवण्यास तयार आहे. दरम्यान 2009नंतर पाकिस्तानमध्ये एकही सामना झालेला नाही. दरम्यान वेस्ट इंडिजआणि झिंम्बावे यांनी पाकिस्तानसोबत टी-20 सामना खेळले आहेत.

Loading...

आशियाई चॅम्पियन आहे भारत

जर, भारत आशियाई स्पर्धा खेळला नाही तर, त्यामुळं आशियाई क्रिकेट काउंसिलचा याचा फटका बसेल. भारत तब्बल 7 वेळा आशियाई चषक जिंकला आहे. गेल्यावर्षी दुबईमध्ये झालेल्या आशियाई चषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं विजेतेपद पटकावले होते.

वाचा-वर्ल्डकपआधी साऊथ आफ्रिकेला मोठा धक्का, 'हा' मुख्य खेळाडू स्पर्धेबाहेर

वाचा- आता हेच राहिलं होतं, धोनी झाला बांगलादेशचा कर्णधार!

वाचा-World Cup : केएल राहुलच्या एका शतकामुळं होणार 'या' तीन खेळाडूंचा पत्ता कट

वाचा-धोनीनं लावली बांगलादेशची फिल्डिंग, VIDEO व्हायरल


टीम इंडियाचा विजय मोठ्या पडद्यावर, '83' सिनेमाच्या निमित्तानं आदिनाथ कोठारेशी गप्पा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 29, 2019 06:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...