आता गाठ श्रीलंकेशी

आता गाठ श्रीलंकेशी

भारतीय संघ 26 जुलैपासून श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. तीन कसोटी सामन्यासाठी संघाच्या 16 सदस्यांची निवड करण्यात आलीय.

  • Share this:

10 जुलै: वेस्ट इंडीज विरोधातील वनडे मालिका 3-1ने जिंकल्यानंतर भारतीय संघ 26 जुलैपासून श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. तीन कसोटी सामन्यासाठी संघाच्या 16 सदस्यांची निवड करण्यात आलीय.

के.एल. राहुल संघात परतलाय. तर अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपद कायम ठेवण्यात आलंय. श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघ तीन कसोटी, 5 वनडे आणि 1 टी-20 सामना खेळणार आहे. त्याआधी दोन्ही संघांसाठी 2 सराव सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय. 21 व 22 जुलै रोजी हे सराव सामने खेळण्यात येणार आहेत.

या मालिकेतील पहिली कसोटी 26 जुलैपासून कँडी येथे, दुसरी कसोटी 3 ऑगस्टपासून गॅलेला तर तिसरी व शेवटची कसोटी 12 ऑगस्टपासून कोलंबो येथे खेळण्यात येणार आहे. 20 ऑगस्टपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील एकमेव टी-20 सामना कोलंबो येथे 6 सप्टेंबरला खेळला जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2017 10:15 AM IST

ताज्या बातम्या