टीम इंडियाच्या हेड कोच निवडीसाठी हालचाली सुरू, शास्त्रींचा पत्ता होणार कट?

टीम इंडियाच्या हेड कोच निवडीसाठी हालचाली सुरू, शास्त्रींचा पत्ता होणार कट?

कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली असणारी समिती आज प्रशिक्षक पदासाठी एका नावावर शिक्कामोर्तब करणार आहे.

  • Share this:

मुंबई, 16 ऑगस्ट : टीम इंडियाला आज मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. यासाठी कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीनं मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. या समितीमध्ये माजी क्रिकेटर अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटर शांता रंगास्वामी यांचा समावेश असणार आहे. या पदासाठी रवी शास्त्री, रॉबीन सिंग, लालचंद राजपूत, माईक हेसन, टॉम मूडी आणि फिल सिमन्स शर्यतीत आहेत. सायंकाळी सात वाजता याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

मुंबईत आज मुख्य प्रशिक्षक आणि टीम इंडियाच्या स्टाफसाठी मुलाखती आज पार पडणार आहे. यात रॉबीन सिंह यांच्यापासून मुलाखतीला सुरुवात झाली. रॉबीन सिंग आयपीएलमध्ये मुंबई संघाचे कोच होते. त्याचबरोबर सपोर्ट स्टाफची आज घोषणा होणार आहे. सपोर्ट स्टाफसाठी निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद मुलाखती घेणार आहेत. टीम इंडियाच्या प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी जवळ जवळ 2 हजार अर्ज करण्यात आले होते.

कोचसाठी 'या' होत्या अटी

वर्ल्ड कपनंतर बीसीसीआयनं मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागविले होते. यासाठी किमान 30 कसोटी आणि 50 एकदिवसीय सामने खेळणे गरजेचे होते. मात्र माईक हेसन यांच्याबाबतीत हा नियम डावलण्यात आला. हेसनंनं एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

वाचा-टीम इंडियाला 24 तासात मिळणार नवा कोच, 'या' सहा दिग्गजांमध्ये स्पर्धा!

प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्रींचे नाव आघाडीवर

भारताचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कार्यकाळ वाढवण्यात आला होता. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर भारतीय संघानं नमवलं. जुलै 2017मध्ये शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतानं 21 कसोटी सामने खेळले त्यातील 13 सामन्यात विजय मिळवला. तर, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 36 सामन्यांपैकी 25 सामन्यात विजय मिळवला. मात्र रवी शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भारताला वर्ल्ड कप जिंकता आला नाही. तरी, आशियाई कर, ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय आणि भारताचे आयसीसी रॅकिंग यामुळं रवी शास्त्रींचा पुन्हा विचार होऊ शकतो.

वाचा-भारताच्या आक्रमक क्रिकेटरची आर्थिक अडचणींना कंटाळून आत्महत्या

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी, जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 01:51 PM IST

ताज्या बातम्या