हेड कोचच्या शर्यतीत रवी शास्त्री आणि ‘या’ विदेशी कोचमध्ये होणार कांटे की टक्कर!

आज सात वाजता प्रशिक्षकपदाच्या नावाची आणि सपोर्ट स्टाफ घोषणा होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 16, 2019 02:30 PM IST

हेड कोचच्या शर्यतीत रवी शास्त्री आणि ‘या’ विदेशी कोचमध्ये होणार कांटे की टक्कर!

मुंबई, 16 ऑगस्ट : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आज मुलाखत होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सात वाजता प्रशिक्षकपदाच्या नावाची आणि सपोर्ट स्टाफ घोषणा होणार आहे. या पदासाठी रवी शास्त्री, रॉबीन सिंग, लालचंद राजपूत, माईक हेसन, टॉम मूडी आणि फिल सिमन्स शर्यतीत आहेत. सायंकाळी सात वाजता याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीनं मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. या समितीमध्ये माजी क्रिकेटर अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटर शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे.

प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्रींचे नाव आघाडीवर

भारताचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कार्यकाळ वाढवण्यात आला होता. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर भारतीय संघानं नमवलं. जुलै 2017मध्ये शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतानं 21 कसोटी सामने खेळले त्यातील 13 सामन्यात विजय मिळवला. तर, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 36 सामन्यांपैकी 25 सामन्यात विजय मिळवला. मात्र रवी शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भारताला वर्ल्ड कप जिंकता आला नाही. तरी, आशियाई कर, ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय आणि भारताचे आयसीसी रॅकिंग यामुळं रवी शास्त्रींचा पुन्हा विचार होऊ शकतो.

वाचा-टीम इंडियाच्या हेड कोच निवडीसाठी हालचाली सुरू, शास्त्रींचा पत्ता होणार कट?

स्काईपवरून होणार शास्त्रींची मुलाखत

Loading...

सध्या रवी शास्त्री भारतीय संघासोबत वेस्ट इंडिजमध्ये असल्यामुळं स्काईपच्या माध्यमातून मुलाखत घेणार आहेत. तर, लालचंद राजपूत, हेसन आणि रॉबीन सिंग प्रत्यक्षात मुलाखतीसाठी उपस्थित असतील. भारतासाठी 80 कसोटी सामने आणि 150 एकदिवसीय सामने खेळलेल्या शास्त्रींचा करार इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये संपुष्टात आला होता. मात्र, 45 दिवसांचा अतिरिक्त काळ त्यांना देण्यात आला.

वाचा-भारताच्या आक्रमक क्रिकेटरची आर्थिक अडचणींना कंटाळून आत्महत्या

शास्त्री यांना टॉम मूडी देणार टक्कर

शास्त्रींना माईक हेसन आणि टॉम मूडी प्रशिक्षकपदासाठी टक्कर देऊ शकतात. ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी यांनी 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये लंकेला अंतिम फेरीत पोहचवलं होतं. त्यानंतर 2012 पासून टॉम मूडी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हैदराबादनं 2016 मध्ये आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. 53 वर्षांच्या मूडी यांचं वय 53 असून 8 कसोटी आणि 76 एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव आहे.

वाचा-टीम इंडियाला 24 तासात मिळणार नवा कोच, 'या' सहा दिग्गजांमध्ये स्पर्धा!

SPECIAL REPORT : आई-चिमुकल्याची ताटातूट! 5 दिवसांनंतर बिबट्या मादी आणि बछड्याची अशी झाली भेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 02:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...