तारीख ठरली ! 'या' दिवशी होणार वर्ल्ड कपसाठी 'विराट' सेनेची घोषणा

तारीख ठरली ! 'या' दिवशी होणार वर्ल्ड कपसाठी 'विराट' सेनेची घोषणा

इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे ते 14 जुलै यादरम्यान विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. भारताचा पहिला सामना 6 जून रोजी साऊथ आफ्रिके विरोधात होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 1 एप्रिल : एकीकडं आयपीएलच्या बाराव्या हंगामाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असताना, आता वर्ल्डकपबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विश्वचषकात कोण 11 शिलेदार खेळणार हा सस्पेंस आता संपणार आहे. आता भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी एएनआयनच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 15 शिलेदारांच्या नावाची घोषणा 15 एप्रिलला होणार असल्याची माहिती दिली आहे.इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे ते 14 जुलै यादरम्यान विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.गेल्या वर्षभरात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने देश-परदेशात एकदिवसीय क्रिकेटमध्ये अविश्वसनीय कामगिरी केली आहे. त्यामुळं या विश्वचषकासाठी भारतीय संघाला जेतेपदाचा प्रमुख दावेदार मानला जात आहे. त्यामुळं विराटच्या शिलेदारांकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत.

दरम्यान संघातील केवळ चौथ्या क्रमांकाची जागा वगळता बाकी सर्व जागांसाठी शिलेदार निश्चितच आहेत, आता त्यांची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. ही घोषणा 20 एप्रिलला किंवा त्याआधी होण्याची शक्यता असल्याची माहिती, प्रसाद यांनी दिली. याबाबत त्यांनी ,''आगामी विश्वचषक स्पर्धेत विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दमदार कामगिरी करेल, याबाबत आम्हाला खात्री आहे. भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारे तगडे खेळाडू या संघात असतील. त्यामुळं संघावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि भारतीय संघच विश्वकप जिंकेल'', अशी माहिती दिली.

सध्या भारतीय संघात तीन स्थानांसाठी चुरस आहे. त्यात प्रामुख्याने मधल्या फळीतील चौथ्या क्रमांकाचा फलंदाज, एक अतिरिक्त जलदगती गोलंदाज किंवा फिरकीपटू आणि अतिरिक्त यष्टिरक्षक या जागा चर्चेचा विषय आहेत. दरम्यान याआधी कर्णधार विराट कोहलीनं विश्वचषकासाठीचा संघ निश्चित असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आयपीएलमधून कोणत्या खेळाडूंची वर्णी लागणार हे 15 एप्रिलला कळेलच.


बिर्याणीवरून आधी वाद..नंतर हाणामारी, काँग्रेस कार्यकर्त्यांचा VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 12:00 PM IST

ताज्या बातम्या