मुंबई, 8 जून : श्रीलंकेविरुद्ध वन डे आणि T20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. BCCI ने गुरुवारी रात्री संघाची घोषणा केली. टीम इंडियाची (Team India) मुख्य टीम सध्या इंग्लंडमध्ये आहे. त्याचवेळी जुलै महिन्यात भारतीय क्रिकेट टीमची दुसरी फळी श्रीलंकेविरुद्ध वन-डे आणि टी20 मालिका खेळणार आहे. त्यामुळे या टीम B मध्ये कुणाला स्थान मिळतं याची उत्सुकता होती.
श्रीलंकेमध्ये होणाऱ्या 3 ODI आणि T20 च्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी हा संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळेल. सर्व सामने कोलंबोत होतील. वाइस कॅप्टन असेल भुवनेश्वर कुमार.
🚨 NEWS 🚨: The All-India Senior Selection Committee picked the Indian squad for the 3-match ODI series & the 3-match T20I series against Sri Lanka in July. #TeamIndia
Details 👉 https://t.co/b8kffqa6DR pic.twitter.com/GPGKYLMpMS — BCCI (@BCCI) June 10, 2021
असा असेल भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (विकेट कीपर), संजू सॅमनस (विकेट कीपर), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार)दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.
वनडे सीरिजपासून दौऱ्याला सुरुवात होईल. वनडे मॅच 13 जुलै, 16 जुलै आणि 18 जुलैला होतील.
तर टी-20 स्पर्धा 21 जुलै, 23 जुलै आणि 25 जुलैला खेळवण्यात येतील.
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमधून अजून पूर्णपणे बरा झालेला नसल्यामुळे शिखरला नेतृत्वाची संधी मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Shikhar dhawan