Home /News /sport /

लॉकडाऊनमध्ये विराटसाठी दु:खद बातमी, सगळ्यात जवळच्या 'मित्रा'चा मृत्यू

लॉकडाऊनमध्ये विराटसाठी दु:खद बातमी, सगळ्यात जवळच्या 'मित्रा'चा मृत्यू

दरम्यान विराट वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार की नाही याबाबत साशंकता आहे. 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यासाठी शुक्रवार, 19 जुलै रोजी भारतीय संघाची निवड होणार आहे.

दरम्यान विराट वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार की नाही याबाबत साशंकता आहे. 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यासाठी शुक्रवार, 19 जुलै रोजी भारतीय संघाची निवड होणार आहे.

मुंबईमध्ये राहत असलेल्या विराट कोहली सध्या दु:खात आहे, ते त्याच्या एका खास मित्राच्या मृत्यूमुळं.

  मुंबई, 06 मे : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या लॉकडाऊनमुळं घरातच कैद आहे. पत्नी अनुष्का शर्मासोबत मुंबईमध्ये राहत असलेल्या विराट कोहली सध्या दु:खात आहे, ते त्याच्या एका खास मित्राच्या मृत्यूमुळं. विराट कोहलीचा पेट डॉग ब्रुनोचे निधन झाले. कोहलीनं इन्स्टाग्रामवर ब्रुनोचा फोटो टाकत एक पोस्ट शेअर केली. विराट ब्रुनोला नेहमी आपला खास मित्र म्हणत असे. ब्रुनोच्य मृत्यूचा विराटला जबरदस्त झटका बसला आहे. विराट नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ब्रुनोसोबतचे फोटो शेअर करत असतो. विराटनं ब्रुनोचा फोटो शेअर करत भावुक करणारे कॅप्शन लिहिले आहे. वाचा-हिटमॅनला टी20 मध्ये द्विशतक करण्याची संधी होती पण...
  वाचा-एकही मॅच नाही तरी टीम इंडियानं गमावलं सिंहासन, 2016 नंतर पहिल्यांदा घडला प्रकार विराटनं ब्रुनोचा शेअर करत, "तुझ्या आत्म्यास शांती लाभो. तू गेली 11 वर्ष आमच्यासोबत होतास. तुझ्यासोबत माझं आयुष्यभराचं नातं आहे. आज तू एका आनंदी आणि चांगल्या जागी असशील, अशी आशा करतो", अशी पोस्ट लिहिली आहे. अनुष्का शर्मालाही पाळीव प्राण्यांची विशेष आवड आहे. अनुष्काकडेही एक पेट डॉग आहे. वाचा-ICC चा मोठा निर्णय, भारतीय उद्योगपतीवर दोन वर्षांची बंदी दुसरीकडे कोरोना व्हायरसमुळं सध्या सर्व क्रिकेट सामने रद्द करण्यात आले आहेत. आयपीएल 2020 आणि टोकियो ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता कोरोनामुळं ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपवरही संकट आहेत. त्यामुळं गेले 2 महिने सर्व क्रिकेटपटू घरात कैद आहेत.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Virat kohli

  पुढील बातम्या