कॅप्टन कोहलीनं शेअर केला शर्टलेस व्हिडीओ, युझर म्हणाले...

इन्स्टाग्रामवर प्रसिध्द असलेल्या विराटचा शर्टलेस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2019 04:33 PM IST

कॅप्टन कोहलीनं शेअर केला शर्टलेस व्हिडीओ, युझर म्हणाले...

नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार झाला आहे. सध्या विराट 2 ऑक्टोबरपासून घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका विरोधात होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज आहे. या सगळ्यात विराट कोहलीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. विराटनं शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा सगळीकडे होत आहे. कारण हा व्हिडीओ साधासुधा नसून शर्टलेस आहे. कसोटी मालिकेआधी विराटनं शेअर केलेल्या या शर्टलेस व्हिडीओला युझरनं ट्रोल केले आहे.

विराट कोहलीला प्रत्येक इन्स्टाग्राम पोस्टसाठी मोठी किंमत मिळते. विराट हा क्रिकेट विश्वातला सर्वात जास्त फॉलोअर असणारा खेळाडू आहे. विराटनं हा शर्टलेस व्हिडीओ one8 इनरविअरची जाहिरात करण्यासाठी टाकला होता. या व्हिडीओमध्ये विराट फिट दिसत आहे. त्यामुळं विराटच्या बॉडीची आणि फिचरचे युझरनी कौतुक केले आहे. या व्हिडीओमध्ये विराटनं शॅडो बॉक्सिंग आणि पुश-अप्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.

मात्र 30 वर्षीय फलंदाज विराट कोहलीनं हा व्हिडीओ शेअर करताच त्याला ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे. विराट हा इन्स्टाग्रामवरून सर्वात जास्त कमाई करणारा फलंदाज आहे. इन्स्टाग्रामवर कमाई करणाऱ्य़ा जगभरातील खेळाडूंच्या यादीत विराट टॉप-10 यादीत आहे. या यादीत फुटबॉलचा बादशाह ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान विराटची वर्षभराच्या कमाईवर लक्ष दिल्यास तो जाहिराती आणि इतर प्रमोशन मधून जवळ जवळ 2 कोटी 50 लाख रूपये कमवतो.

विराटला मालिका विजयची गरज

Loading...

भारतीय संघ 2 ऑक्टोबरपासून अफ्रिका विरोधात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र या मालिकेत विराटसेनेला एक पराभवही महागात पडू शकतो. जगातील नंबर 1 कसोटी संघ असलेल्या भारतीय संघाचे स्थान धोक्यात आले आहे. भारत आणि आफ्रिका यांच्यात फक्त मालिकेत विजय मिळवण्याची नाही तर कसोटी रँकिंगमध्ये पाहिले स्थान मिळवण्याची स्पर्धा असणार आहे. त्यामुळे 2 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला एक चूक महागात पडू शकते. दुसरीकडे जर भारताने मालिका गमावली तर दक्षिण आफ्रिका पहिल्या क्रमांकावर विराजमान होईल.

VIDEO: 'पक्षासोबत प्रामाणिक राहणं गुन्हा असेल तर तो मी केलाय'; खडसेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2019 04:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...