टीम इंडिया T20 रँकिंगमध्ये घसरली, विराटने केला बचाव

टीम इंडिया T20 रँकिंगमध्ये घसरली, विराटने केला बचाव

भारतीय संघ टी 20 रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर असला तरी आम्ही त्याचा विचार करणं योग्य समजत नाही असं विराट कोहलीने म्हटलं आहे.

  • Share this:

हैदराबाद, 06 डिसेंबर : भारतीय संघ सध्या आयसीसी क्रिकेट टी 20 रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर आहे. कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघाची बाजू मांडताना म्हटलं आहे की, याबद्दल जास्त विचार केला जाऊ शकत नाही. कारण भारताने अजुन बलाढ्य असा संघच मैदानात उतरवलेला नाही. पुढच्या वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपला डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघाने युवा खेळाडूंना संधी दिली आहे. विंडीजविरुद्ध सुरु होणाऱ्या टी20 मालिकेपूर्वी विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला.

कोलही म्हणाला की, आम्ही पहिल्यांदा फलंदाजीवर लक्ष देऊ त्यानतंर कमी धावसंख्येचा बचाव कसा करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या दोन गोष्टी आहेत ज्यावर जास्त मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. टी 20 हा एक असा क्रिकेट प्रकार आहे ज्यामध्ये तुम्ही एकदिवसीय आणि कसोटीपेक्षा जास्त प्रयोग करू शकता.

झटपट क्रिकेटच्या या प्रकारात तरुणांना संधी देण्याचा आमचा विचार आहे. आता पर्यंत संपूर्ण ताकदीने संघ उतरवेला नाही. यासाठी मला वाटतं की टी20 रँकिंगबद्दल जास्त विचार करणं योग्य नाही. आम्ही त्यावर जास्त लक्ष देणार नाही. टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने आम्ही वाटचाल करत आहे. आपला सर्वोत्तम संघ मैदानात उतरवायला हवा. आशा आहे की वर्ल्ड कपमध्ये आम्ही सर्वात बलाढ्य संघ घेऊन खेळत असू असंही कोहली म्हणाला.

बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत विराट कोहलीने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा संघात आल्यानंतर फलंदाजीत स्थैर्य आणणे आणि मधल्या फळीत असलेल्या अडचणी दूर करण्याला प्राधान्य असेल असं कोहलीने सांगितलं. मधल्या फळीत एकाला मोठी खेळी करावी लागेल तर दुसऱ्याने डाव सावरला पाहिजे. मर्यादित षटकांमध्ये फलंदाजीचा क्रम फारसा महत्वाचा ठरत नाही. तुम्हाला फक्त संघासाठी चांगली खेळी करायची आहे.

मित्र होणार वैरी! पहिल्या टी-20 सामन्यासाठी ‘या’ खेळाडूंना विराट देणार संधी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2019 11:16 AM IST

ताज्या बातम्या