एका सामन्यात 17 km धावतो विराट! रोनाल्डो आणि मेस्सी नाहीत आसपास

एका सामन्यात 17 km धावतो विराट! रोनाल्डो आणि मेस्सी नाहीत आसपास

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटू आहे. विराटची फिटनेस पातळी जगातील दोन सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू पोर्तुगालचे क्रिस्टियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सीसारखी आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 फेब्रुवारी : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटू आहे. त्याची कार्य नैतिकता आणि शिस्त त्याला जगातला सर्वोत्तम खेळाडू बनवते. जगातील निवडक चपळ क्षेत्ररक्षकांमध्ये त्याचा समावेश आहे, विकेट्स दरम्यान त्याची धावणे इतर खेळाडूंनाही प्रेरणा देते. कोहलीने सांगितले आहे की, जर एखादा फलंदाज तंदुरुस्त असेल तर तो एका धावाचे रुपांतर दुहेरीत करू शकतो. यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या फील्डरवर दबाव निर्माण होतो. तंदुरुस्त खेळाडूंना क्षेत्ररक्षण करताना जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. त्यामुळं कोहली मैदानात खेळत नसेल तेव्हाही तंदुरुस्तीवरही लक्ष केंद्रित करतो. विराटची फिटनेस पातळी जगातील दोन सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू पोर्तुगालचे क्रिस्टियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सीसारखी आहे.

वाचा-बॉलिवूडचे हिरो कोहलीसमोर झिरो! शाहरूख, अक्षयपेक्षा विराट सर्वात मोठा ‘ब्रॅण्ड’

वाचा-विराटच्या एका चुकीमुळे खेळाडूंना मिळणार नाहीत पूर्ण पैसे

टीम इंडियाचे निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी विराटच्या फिटनेसचे कौतुक केले. प्रसाद यांनी, “कोहलीच्या आगमनानंतर टीम इंडियाची फिटनेस पातळी खूप सुधारली आहे”, असे सांगितले. प्रसाद यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की जेव्हा कोहली सामन्यात चांगला डाव खेळतो तेव्हा तो सरासरी 17 किमी धावतो तर एक फुटबॉलर 8 ते 13 किमीच्या सरासरीने धावतात. कोहली रोनाल्डो आणि मेस्सीपेक्षा दुप्पट वेगाने धावतो. रोनाल्डो 90 मिनिटांच्या सामन्यात 8.30 किमी धावतो तर मेस्सी 7.6 किमी. तंदुरुस्तीशिवाय कोहली संघाच्या क्षेत्ररक्षणावरही खूप भर देतो. आज टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण हा जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे.

वाचा-कर्णधार विराट कोहलीची 'दादा'गिरी, अर्धशतकासह नोंदवले हे विक्रम

वाचा-विराटचा थ्रो पाहून जॉन्टी ऱ्होड्सला विसराल, VIDEO एकदा बघाच

बीसीसीआय फिजिओ वर्कलोडवर नजर ठेवते

प्रसाद यांनी टीम इंडियाच्या फिटनेसबाबत सांगताना, “ज्या खेळाडूंचा बीसीसीआयबरोबर करार आहे त्यांच्याकडे कामगिरीकडे जीपीएसद्वारे लक्ष दिले जाते. फिजिओ या वर्कलोडच्या आधारे टीम आणि खेळाडूंचे सराव वेळापत्रक बनवते. सर्व संघ हे करतात. वर्कलोड मॅनेजमेंट सिस्टम टीमचे प्रशिक्षक शंकर बसू यांनी आणले होते. त्यानुसार वेळापत्रक तयार करतात', असे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2020 11:39 AM IST

ताज्या बातम्या