नवी दिल्ली,23 मार्च : देशात सध्या कोरोनामुळे तणावाचे वातावरण आहे. कोरोनामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. या सगळ्यात भारतीय फलंदाजांच्या घरी नवा पाहुणा आला आहे. भारतीय संघाचा मधल्या फळीचा फलंदाज सुरेश रैना दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. आज त्याची पत्नी प्रियांका रैना हिने मुलाला जन्म दिला. याआधी 2016 मध्ये त्यांनी मुलीला जन्म दिला होता.
वरिष्ठ क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांनी ट्विटर वरून याबाबत माहिती दिली. बोरिया यांनी, "पुन्हा एकदा बाबा झालेल्या सुरेश रैनाला अभिनंदन. आई आणि बाळ दोन्ही सुखरूप आहे. सुरक्षित राहा, सुखी राहा", असे ट्वीट करत ही माहिती दिली. सुरेश आणि प्रियांका यांचा 2015 मध्ये विवाह झाला होता. 2015 मध्ये वर्ल्ड कपनंतर रैनाने विवाह केला होता.
एकीकडे कोरोनाशी दोनहात करण्याची तयारी भारत करत असताना रविवारी (22 मार्च) रोजी रैनाने सोशल मीडियावरून लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले होते.
सुरेश रैना 2018नंतर भारताकडून एकही सामना खेळलेला नाही. आक्रमक फलंदाज म्हणून ओळख असणाऱ्या रैनासाठी आयपीएल ही स्पर्धा महत्त्वाची आहे. 29 मार्चपासून सुरू होणारी स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. आता 15 एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे, याबाबत 24 मार्च रोजी बीसीसीआयच्या बैठकीत निर्णय होईल.
Many congrats @ImRaina on being father. Glad mum and baby are safe and healthy. Stay safe and stay blessed.
चेन्नई सुपकिंग्जकडून खेळताना रैनाने अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. आयपीएल मध्ये सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रमही रैनाच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने संघात पुन्हा जागा मिळवण्यासाठी रैनासाठी आयपीएल ही शेवटची संधी आहे.
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.