world cup 2019 : वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर, ऋषभ पंतला डच्चू

world cup 2019 : वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर, ऋषभ पंतला डच्चू

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयने 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 एप्रिल : सध्या आयपीएलचा थरार देशात रंगला असताना इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयने जाहीर केली.

2019 च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक

2015 चा वर्ल्ड कप संघ : महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), विराट कोहली (उपकर्णधार), अजिंक्य रहाणे, शिखर धवन, रोहित शर्मा, स्टुअर्ट बिन्नी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, अंबाती रायडू, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि इशांत शर्मा.

जूनच्या 30 तारखेला इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. यासाठी भारताने 15 खेळाडूंची निवड केली आहे. या निवडीच्या आधी कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघातील जवळपास सर्व खेळाडू निश्चित झाले असून फक्त एकदोन बदल होतील असे सांगितले होते.

पाहा : world cup 2019 : वर्ल्डकपसाठी विराट सेना, हे आहेत 15 शिलेदार

दरम्यान, देशात आयपीएल सुरू असल्याने त्यातील कामगिरीवर कोणत्या खेळाडूची निवड होणार का ? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत असताना निवड समितीने आय़पीएलच्या कामगिरीवरून कोणत्याही खेळा़डूची निवड होणार नाही हे स्पष्ट केले होते.

आय़सीसीने संघ निवडण्यासाठी 23 एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. आतापर्यंत न्यूझीलंड, अफगाणिस्ताननंतर ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केले आहेत.

VIDEO : 'पुन्हा असं बोलायचं नाही', जाहीर सभेतच शरद पवारांनी दिली अमरसिंह पंडितांना वॉर्निंग

First published: April 15, 2019, 3:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading