मोदी सरकारचं नाही ऐकणं टीम इंडियाच्या मॅनेजरला पडणार भारी, मिळणार शिक्षा!

मोदी सरकारचं नाही ऐकणं टीम इंडियाच्या मॅनेजरला पडणार भारी, मिळणार शिक्षा!

वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान देशाच्या उच्च अधिकाऱ्यांशी गैरवर्तणुक केल्याप्रकरणी बीसीसीआयला मोठा फटका बसणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. यात टी-20 मालिका भारतीय संघानं खिशात घातल्यानंतर 14 ऑगस्टला तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवत एकदिवसीय सामन्यातही क्लिन स्विपसाठी तयार आहेत. यानंतर भारतीय संघ दोन कसोटी सामने खेळणार आहेत. मात्र त्याआधी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशासकिय मॅनेजर सुनील सुब्रहमण्यम यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान देशाच्या उच्च अधिकाऱ्यांशी गैरवर्तणुक केल्याप्रकरणी बीसीसीआयला मोठा फटका बसणार आहे. बीसीसीआयच्या सुत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाला केंद्र सरकारनं जल संरक्षण एक छोटी जाहिरात करण्यास सांगितले होते. दरम्यान बीसीसीआयच्या वतीनं सुनील सुब्रहमण्यम हे याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार होते. मात्र त्यांनी फोनच न उचलल्यामुळं गोंधळ झाला आहे.

वाचा-भाऊ असावा तर असा! रक्षाबंधनआधीच बुमराहनं बहिणीला दिलं अनोखं सरप्राईज

मॅनेजरनं केली नाही कोणतीही मदत

बीसीसीआयच्या सुत्रांनी, “त्रिनिदाद-टोबॅगोमध्ये जेव्हा भारतीय उच्च अधिकाऱ्यांनी सुब्रहमण्यम यांच्याशी मदतीबाबत बोलले असता, त्यांनी टाळाटाळ केली. तसेच, माझ्यासाठी एवढे मजकूर पाठवून नका असे सांगितले. तसेच, सुब्रहमण्यम यांनी या जाहिरातीसाठी कोणतीही मदत केली नाही. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबतच सुब्रहमण्यम यांचा कार्यकाळ 45 दिवस वाढवण्यात आला. त्यामुळं वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघात मोठे बदल केले जाणार आहेत. भारताचा वेस्ट इंडिज दौऱ्या 3 सप्टेंबर रोजी संपणार असून, त्यानंतर सुब्रहमण्यम यांचा कार्यकाळ संपणार आहे.

वाचा-जवानापेक्षा कमी नाही धोनीचा जोश! गंभीर दुखापतीतही सीमेवर करतोय देशाचे संरक्षण

VIDEO : भाजप नगरसेविकेनं पूरग्रस्तांवरच उचलला हात, लोकांनी दिल्या 'भाजप मुर्दाबाद'च्या घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2019 08:27 PM IST

ताज्या बातम्या