भारताचा हा माजी प्रशिक्षक निघाला सट्टेबाज, बडोदा पोलिसांनी केली अटक

यावेळी प्रशिक्षकांबरोबर अठरा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2019 08:15 AM IST

भारताचा हा माजी प्रशिक्षक निघाला सट्टेबाज, बडोदा पोलिसांनी केली अटक

बडोदा, 03 एप्रिल : भारतीय महिला संघाच्या एका माजी प्रशिक्षकाला आयपीएलच्या बाराव्या हंगामात सट्टा लावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बडोदा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तुषार आरोठेने असे या प्रशिक्षकाचे नाव असून, तुषार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक होते. यावेळी तुषार यांच्यासह अठरा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर काही मोबाईल आणि गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत.रमेश पोवार यांच्या आधी तुषार हे महिला संघाचे प्रशिक्षक होते. दरम्यान महिला खेळाडूंसोबत मतभेद झाल्यानंतर, त्यांना बीसीसीआयनं या पदावरून काढून टाकले. काही महिला खेळाडूंनी आरोठेंविरोधात बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

तुषार हे बडोदा संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू आहेत. दरम्यान, तुषार यांनी प्रशिक्षकपद सोडल्यानंतर दोन कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असलेले पोवार यांना या संघाचे प्रभारी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. महिला संघाने अंतिम फेरी गाठलेल्या विश्वचषकादरम्यान, आरोठे आणि संघातील वरिष्ठ खेळाडूंमधील मतभेद वाढले होते. दरम्यान, आरोठे कधीपासून सट्टा लावत आहेत, याबाबत बडोदा पोलिस चौकशी करित आहेत.

Loading...


VIDEO कॉलर उडवल्याने काय होतं? बलात्कार थांबतात - उदयनराजे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 3, 2019 08:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...