मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

जर्मनीत अडकला भारताचा दिग्गज खेळाडू, कोरोनामुळे 15 दिवस तुटला कुटुंबाशी संपर्क

जर्मनीत अडकला भारताचा दिग्गज खेळाडू, कोरोनामुळे 15 दिवस तुटला कुटुंबाशी संपर्क

जर्मनीत एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेलेला दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद कोरोनामुळे तेथे अडकला आहे.

जर्मनीत एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेलेला दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद कोरोनामुळे तेथे अडकला आहे.

जर्मनीत एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेलेला दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद कोरोनामुळे तेथे अडकला आहे.

    नवी दिल्ली, 16 मार्च : भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद कोरोनापासून वाचण्यासाठी धडपडत आहे. पाच वेळचा चॅम्पियन आणि स्टार विश्वनाथन आनंद बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेण्यासाठी जर्मनीला गेला होता. मात्र कोरोनामुळे विश्वनाथन आनंद सध्या तिथेच अडकला आहे. आज आनंद भारतात परत येणार होता, परंतु सर्व विमाने रद्द करण्यात आल्यामुळे त्याला काही काळ जर्मनीतच राहावे लागणार आहे. 50 वर्षीय विश्वनाथन आनंद फेब्रुवारीमध्ये जर्मनीला पोहोचला. कुटुंबाला व्हिडीओ कॉल करून आनंदने आपली खुशाली घरच्यांना कळवली. मात्र त्यानंतर तब्बल 15 दिवस आनंदला वेगळे ठेवण्यात आले होते.त्यामुळे 15 दिवस तो कुटुंबाच्या संपर्कात नव्हता. वाचा-एका क्लिकवर मिळवा कोरोनाबाबत अचूक माहिती, भारताने तयार केली खास वेबसाईट टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, आनंद स्पर्धेसाठी तेथे गेला होता. मात्र कोरोनामुळे सर्व विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आनंद जर्मनीत अडकला आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना आनंदने, “हा एक अनोखा अनुभव आहे. माझ्या आयुष्यात प्रथमच मला एकटे राहावे लागत आहे. मी रोज मुलगा अखिल आणि पत्नी यांच्याशी व्हिडीओ कॉलवरून संवाद साधतो. हा प्रसंग कठिण असला तरी, समोरे जावे लागेल”, असे सांगितले. वाचा-कोरोनाचा IPLला दणका! एका झटक्यात मुंबई इंडियन्सला बसणार हजारो कोटींचा फटका 27 जानेवारी 2020 रोजी जर्मनीमध्ये कोरोना विषाणूची पहिली घटना उघडकीस आली. परंतु फेब्रुवारीमध्ये त्याची संख्या वाढली. वाढत्या घटनांनंतर जर्मनीने कोरोना व्हायरसचा प्रसार देशात रोखण्यासाठी फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, डेन्मार्क आणि लक्झेंबर्गमधून येणारी विमानसेवा रद्द केली. वाचा-LIVE शोमध्ये खेळाडू सांगणार होता आनंदाची बातमी पण कोरोनामुळे मिळाला वाईट निरोप आनंदचे कुटुंबिय चिंतेत पत्नी चिंतेत आनंद सध्या जर्मनीत असल्यामुळे त्याची पत्नी अरुणा खूपच काळजीत आहे. अरुणा यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, “आनंद तिथे आहे हे आश्चर्यकारक आहे. पण तिथे खचलेल्या इतरांपेक्षा त्यांची परिस्थिती चांगली आहे याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही त्यांची खूप आठवण करतो आणि सतत त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यावी आणि सतत हात धुवायला सांगतो”, असे सांगितले दरम्यान, या महिन्याच्या अखेरीस आनंदला भारतात आणले जाईल अशी अपेक्षा आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Viswanathan anand

    पुढील बातम्या