नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma)हिने काही दिवसापूर्वी, विराटसोबतची बायो बबल(Bio-Bubble) लाईफ शेअर केली होती. या बायो बबल नियमामुळे दोघांच्यात दुरावा निर्माण झाला होता. मात्र, आता विराट या नियमातून बाहेर पडला असून तो आता आपल्या फॅमिलसोबत वेळ घालवताना दिसत आहे.
विराट कोहलीने ट्विटरवर अनुष्का आणि वामिकासोबतचा फोटो शेअर केला. या फोटोत दुबईतील कुठल्याशा एका हॉटेलमध्ये कोहली कुटुंब नाश्त्यासाठी पोहोचलं होतं. विराट आणि अनुष्का अगदी समोरासमोर बसले आहेत. पण वामिकाचा चेहरा या फोटोमध्ये पाहायला मिळालेला नाही.
— Virat Kohli (@imVkohli) October 20, 2021
येत्या 23 ऑक्टोबर रोजी भारताचा पाकिस्तानशी हाय व्होल्टेज सामना होतो आहे. प्रेक्षकांसहित खेळाडूंवरही या सामन्याचं दडपण आहे. सगळेच खेळाडू नेटमध्ये कसून सराव करतायत. पण जरासा तणाव दूर करण्यासाठी विराट आपल्या कुटुंबाला घेऊन नाश्यासाठी पोहोचला. विराटने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
काहीदिवसापूर्वी, गेल्या काही दिवसांपासून आयपीएलमुळे लांब असल्याने अनुष्का थेट यूएईमध्ये दाखल झाली आहे. पण, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली इतर खेळाडूंप्रमाणे बायो-बबलमध्ये (Bio-Bubble) आहे. त्यामुळे दोघांची भेट काही केल्या झाली नाही. त्यामुळे दोघेही लांबूनच एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले.
View this post on Instagram
तेव्हा अनुष्काने विराटचे काही फोटो शेअर करत विराटसोबतची बायो बबलची लाईफ कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma, T20 league, T20 world cup, Virat kohli, Virat kohli and anushka sharma