मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Rohit Sharma: हिटमॅन बनला सिक्सर किंग, नागपुरात रोहितच्या नावे हा वर्ल्ड रेकॉर्ड

Rohit Sharma: हिटमॅन बनला सिक्सर किंग, नागपुरात रोहितच्या नावे हा वर्ल्ड रेकॉर्ड

रोहित शर्मा बनला सिक्सर किंग

रोहित शर्मा बनला सिक्सर किंग

Rohit Sharma: आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक सिक्सरच्या बाबतीत किवी फलंदाज मार्टिन गप्टिल आणि रोहित शर्मामध्ये रेस सुरु आहे. पण रोहित आता दोन्ही बाबतीत मार्टिन गप्टिलपेक्षा वरचढ ठरला आहे.

    नागपूर, 23 सप्टेंबर: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं नागपूरच्या दुसऱ्या टी20त कमाल केली. खरं तर हा सामना 8-8 ओव्हरचा झाला. पण त्यात रोहितची भूमिका फार महत्वाची ठरली. 8-8 ओव्हरच्या सामन्यातही आधी गोलंदाजांचा त्यानं व्यवस्थित वापर केला. आणि त्यानंतर एका बाजून विकेट पडत असतानाही 91 धावांचं आव्हान गाठताना रोहित खेळपट्टीवर शेवटपर्यंत उभा राहिला. रोहितच्या नाबाद 46 धावांच्या इनिंगनं भारताचा विजय सोपा केला. पण याच कामगिरीसोबत रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सिक्सर किंग ठरलाय. हिटमॅन बनला सिक्सर किंग आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक सिक्सरच्या बाबतीत किवी फलंदाज मार्टिन गप्टिल आणि रोहित शर्मामध्ये रेस सुरु आहे. पण रोहित आता दोन्ही बाबतीत मार्टिन गप्टिलपेक्षा वरचढ ठरला आहे. नागपूरच्या सामन्यात रोहितनं जोश हेजलवूडला पहिलाच सिक्स ठोकला तेव्हा त्यानं सर्वाधिक सिक्सरचा गप्टिलचा रेकॉर्ड ब्रेक केला. या सामन्यात रोहितनं एकूण 4 सिक्स लगावले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20त त्याच्या नावावर आता सर्वाधिक 176 सिक्स जमा आहेत. तर गप्टिलच्या खात्यात आहेत 172 सिक्स. हेही वाचा - Ind vs Aus: हिशेब चुकता... मोहालीतल्या पराभवाची परतफेड नागपूरमध्ये, 6 विकेट्सनी भारत विजयी टॉप 5 सिक्सर किंग रोहित शर्मा – 176, भारत मार्टिन गप्टिल – 172, न्यूझीलंड ख्रिस गेल – 124, वेस्ट इंडिज ऑईन मॉर्गन – 120, इंग्लंड अरॉन फिंच – 119, ऑस्ट्रेलिया
    Published by:Siddhesh Kanase
    First published:

    Tags: Cricket news, India vs Australia, Rohit sharma, Sports, Team india

    पुढील बातम्या