President Cup : वर्ल्ड चॅम्पियनशीपआधी मेरी कोमचा गोल्डन पंच!

President Cup : वर्ल्ड चॅम्पियनशीपआधी मेरी कोमचा गोल्डन पंच!

21 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेआधी मेरीनं सुवर्णपदक जिंकले.

  • Share this:

लाबुआन, 28 जुलै : सहावेळा वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोमनं वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपआधी प्रेसिडन्सी कपमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. इंडोनेशियातील लाबुआन येथे सुरु असलेल्या President Cup 51 किलो वजनी गटात मेरी कोमने ही कामगिरी केली.

37 वर्षीय मेरी कोमनं अंतिम फेरीत आपल्या ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्धी एप्रिल फ्रेंक्सचा 5-0च्या फरकाने पराभव केला. याआधी मे महिन्यात मेरीनं इंडिया ओपनमध्ये सुवर्णपदक कमावले होते. दरम्यान, आगामी ऑलिम्पिक स्पर्धा लक्षात घेता मेरी कोमने ठराविक स्पर्धांमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही मेरी सहभागी झाली नव्हती. त्यामुळं ऑलिम्पिकच्या तयारीआधी हे पदक भारतासाठी आणि मेरीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

मेरीनं आपल्या ट्विटरवर विजयाचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत तिनं, "इंडोनिशायत मी देशासाठी सुवर्ण पदक जिंकले आहे. जिंकण्याचा अर्थ असतो की, तुम्ही आणखी जास्त मेहनत करण्यासाठी सज्ज आहात. मी कोच आणि स्टाफ यांने आभार मानते", असे ट्वीट केले आहे.

वाचा-'तो' निर्णय घेऊन धर्मसेना यांनी काहीच चुक केली नाही-ICC

वाचा- धोनीपेक्षाही चतुर निघाला 'हा' विकेटकीपर, VIDEO पाहून व्हाल हैराण!

21 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेआधी सराव म्हणून मेरी कोमने President Cup स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला, आणि आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत मेरीने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.

वाचा-पुन्हा वाद चिघळला, रोहितमुळे विराटनं पत्रकार परिषद घेण्यास दिला नकार!

योगींनी कधी मनपाही चालवली नाही, मग कसे झाले मुख्यमंत्री; अमित शहांनी केला खुलासा!

Published by: Akshay Shitole
First published: July 28, 2019, 7:57 PM IST
Tags: mary kom

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading