मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs NZ: पंड्याची गँग सुसाट... फक्त 23 बॉलमध्ये भारतीय बॉलर्सनी पाहा न्यूझीलंडला कसं गुंडाळलं?

Ind vs NZ: पंड्याची गँग सुसाट... फक्त 23 बॉलमध्ये भारतीय बॉलर्सनी पाहा न्यूझीलंडला कसं गुंडाळलं?

टीम इंडियाच्या बॉलर्सचा किवींना दणका

टीम इंडियाच्या बॉलर्सचा किवींना दणका

Ind vs NZ: 15 व्या ओव्हरपर्यंत न्यूझीलंड 2 बाद 130 अशा मजबूत स्थितीत होती. पण 16 व्या ओव्हरमध्ये सिराजनं सगळी समीकरणं बदलून टाकली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

नेपियर, 22 नोव्हेंबर: माऊंट माँगानुईची दुसरी टी20 जिंकून सिरीज जिंकण्यासाठी मैदानात उतरलेल्या हार्दिक पंड्याच्या टीम इंडियानं नेपियरमध्येही कमाल केली. टॉस हरल्यानंतरही भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करताना न्यूझीलंड संघाला 160 धावात गुंडाळलं. मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग या युवा गोलंदाजांनी 4-4 विकेट्स घेत किवी फलंदाजीला वेसण घातली. त्यामुळे ग्लेन फिलिप आणि डेव्हिड कॉनवेच्या 86 धावांच्या भागीदारीनंतरही न्यूझीलंडवर ऑल आऊट होण्याची वेळ आली.

4 ओव्हरमध्ये बदललं चित्र

15 व्या ओव्हरपर्यंत न्यूझीलंड 2 बाद 130 अशा मजबूत स्थितीत होती. पण 16 व्या ओव्हरमध्ये सिराजनं सगळी समीकरणं बदलून टाकली. सिराजनं या ओव्हरमध्ये ग्लेन फिलिप्सला माघारी धाडलं आणि त्यानंतर पुढच्या 23 बॉलमध्ये न्यूझीलंडच्या डावाला गळती लागली. न्यूझीलंडकडून कॉनवेनं 54 तर फिलिप्सनं 59 धावांची खेळी केली. पण त्यानंतर एकाही किवी फलंदाजाला पीचवर टिकता आलं नाही. त्यात सिराज आणि अर्शदीपसमोर न्यूझीलंडची चांगलीच दाणादाण उडाली आणि न्यूझीलंडचा डाव 160 धावात संपुष्टात आला.

हेही वाचा - MS Dhoni: खरंच महेंद्रसिंग धोनीनं केली 'ही' मोठी चूक? तर 'त्या' एका निर्णयाचा होईल धोनी अँड कंपनीला पश्चाताप

सिराजचं 'राज', अर्शदीप प्रभावी

सिराजनं अवघ्या 17 धावात 4 तर अर्शदीपनं 37 धावात 4 विकेट्स घेतल्या. तर हर्षल पटेलनं एक विकेट घेतली. टी20 क्रिकेटमध्ये दोन भारतीय गोलंदाजांची 4-4 विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. नेपियरच्या मैदानात या दोन युवा गोलंदाजांनी हा कारनामा केला.

First published:

Tags: Sports, T20 cricket, Team india