मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ind vs Eng: आर अश्विनने इंग्लंडच्या 'या' खेळाडूला तब्बल 8 वेळा दाखवला पव्हेलियनचा रस्ता

Ind vs Eng: आर अश्विनने इंग्लंडच्या 'या' खेळाडूला तब्बल 8 वेळा दाखवला पव्हेलियनचा रस्ता

India Vs England: दुसऱ्या डावात भारताने (India) पुनरागम करत इंग्लंडचा (England) पूर्ण संघ 178 धावांत ऑल आऊट (All out) केलं आहे.

India Vs England: दुसऱ्या डावात भारताने (India) पुनरागम करत इंग्लंडचा (England) पूर्ण संघ 178 धावांत ऑल आऊट (All out) केलं आहे.

India Vs England: दुसऱ्या डावात भारताने (India) पुनरागम करत इंग्लंडचा (England) पूर्ण संघ 178 धावांत ऑल आऊट (All out) केलं आहे.

चेन्नई, 08 फेब्रुवारी: सध्या भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) दरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना (test match) चेन्नई येथे खेळला जात आहे. या सामन्यावर इंग्लंड संघाची पकड अगदी सुरुवातीपासूनच आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटच्या (Joe Root) पहिल्या डावातील द्विशतकी खेळीमुळे इंग्लंड चांगल्या स्थितीत आहे. याउलट भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि भारताचा सलामीवीर फलंदाज रोहीत शर्मा (Rohit sharma) यांचा फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पण दुसऱ्या डावात भारताने पुनरागम करत इंग्लंडचा पूर्ण संघ 178 धावांत ऑल आऊट केलं आहे. यामध्ये भारताचा फिरकीपटू आर अश्विनने (R Ashwin) महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याने इंग्लंडच्या सहा खेळाडूंना तंबूत पाठवलं आहे.

क्रिकेट विश्वात आर अश्विन हा सर्वोत्तम फिरकीपटू म्हणून ओळखला जातो. त्याने चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी सामन्यात आपल्या फिरकीची जादू दाखवली आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात 3 बळी घेतले होते, तर दुसऱ्या डावात त्याने इंग्लंडच्या 6 फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. पण इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज बेन स्टोक्सची विकेट विशेष महत्त्वाची ठरली आहे. यावेळी बेन स्टोक्स 12 चेंडूत केवळ 7 धावा करू शकला. अश्विनने फिरकी टाकत इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज बेन स्टोक्सला आपल्या जाळ्यात अडकवलं आहे.  आर अश्विनने आतापर्यंत बेन स्टोक्सला तब्बल 8 वेळा बाद करण्याची किमया साधली आहे.

हे ही वाचा-Ind vs Eng: इशांत शर्माच्या 300 विकेट्स पूर्ण; 'या' यादीत मिळवलं स्थान

त्याने दुसऱ्या डावातील 18 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर बेन स्टोक्सला चकमा देत यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हातून झेलबाद केलं आहे. स्टोक्स व्यतिरिक्त अश्विनने डेविड वॉर्नर, ऍलिस्टर कूक यांनाही कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा बाद केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज वॉर्नरला अश्विनने सर्वाधिक 10 वेळा बाद केलं आहे. तर इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार कूकला 9 वेळा बाद केलं आहे.

विशेष बाब म्हणजे, आर अश्विन डावखुऱ्या फलंदाजांसाठी धोक्याची घंटा असतो. बेन स्टोक्स हाही डावखुरा फलंदाज आहे. त्यामुळे तो आतापर्यंत 8 वेळा आर अश्विनचा शिकार बनला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्याचा विश्वविक्रमही भारतीय फिरकीपटू आर अश्विनच्या नावावर आहे.

First published:

Tags: India vs england, R ashwin