नवी दिल्ली, 20 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) अकस्मित मृत्यूच्या धक्क्यातून अद्यापही चाहते सावरू शकत नाही आहे. सुशांतनं राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली, तो नैराश्यात असल्याचे बोललं जात आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर आता मानसिक स्वास्थ्य आणि नैराश्येवर चर्चा सुरू झाल्या आहेत, ही फार महत्त्वाची गोष्टीही आहे. केवळ बॉलिवूड स्टार्सच नाही तर भारतीय क्रिकेटरही नैराश्येचे बळी पडले आहेत. अशाच एक क्रिकेटपटूनं, “काही काळ मी ही नैराश्येत सुसाइड करण्याच्या विचारात होतो”, असा धक्कादायक खुलासा केला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा जलद गोलंदाज मोहम्मद शमी वैयक्तिक आयुष्यामुळं नैराश्येत होता. त्याचा परिणाम त्याच्या खेळावरही झाला होता. यातूनच अनेकवेळा त्याच्या डोक्यात आत्महत्या करण्याचे विचार आले. काही दिवसांपूर्वी शमीनं याबाबत एक मुलाखतीत माहिती दिली होती.
वाचा-धक्कादायक! भारतीय महिला क्रिकेटपटूची गळफास लावून आत्महत्या
खरं तर दोन वर्षांपूर्वी शमी घरगुती समस्यांमुळे नैराश्यात आला होता. त्याची पत्नी हसीनं जहांनं त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. शमीवर तुरुंगात जाण्याचीही वेळ आली होती. मात्र शमीनं या समस्येचा सामना केला, आणि क्रिकेटकडे लक्ष दिले.
‘आत्महत्येचा विचारही आला होता मनात’
शमीनं एका मुलाखतीत सांगितले की, “माझ्या डोक्यात अनेकदा आत्महत्येचे विचार आले. मात्र माझ्या घरच्यांना माझी मनस्थिती कळली तेव्हा त्यांनी मला कधीही एकटं सोडलं नाही. प्रत्येकवेळी माझ्यासोबत कोणीतरी असायचं. माझ्याशी बोलायचं”. हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना शमीनं सांगितले की, त्यानं अध्यत्माचा मार्ग निवडला. त्यातून त्याला मदत झाली. यासाठी त्यानं मानसोपचार तज्ज्ञांचीही मदत घेतली. शमी नैराश्येत होता, मात्र त्याचवेळी त्याला भारतीय संघात संधी मिळाली आणि त्यानं त्या संधीचं सोनं केलं. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यानं महत्त्वाची भुमिका बजावली. शमीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध घेतल्या 16 विकेट.
वाचा-...आणि धोनी हादरला, सुशांतच्या आत्महत्येची बातमीनंतर अशी झाली माहीची अवस्था
विराट कोहलीनं दिली साथ
शमीन असेही सांगितले की त्याच्या कठिण समयी विराटनं त्याला साथ दिली. भारतीय संघाचा कर्णधार विराट शमीला काय संधी द्यायचा. भारतीय संघातील इतर खेळाडूंनीही शमीला विश्वास दिला आणि त्याचे समर्थन केले.
संपादन-प्रियांका गावडे.
वाचा-मोहम्मद शमीच्या पत्नीनं शेअर केला NUDE फोटो, पतीसाठी लिहिला खास मेसेज मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.