धवननं घेतली भाजप मंत्र्यांची भेट, चाहते विचारतात कधी करणार पक्षप्रवेश!

धवननं घेतली भाजप मंत्र्यांची भेट, चाहते विचारतात कधी करणार पक्षप्रवेश!

दुखापतींमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडलेला शिखर धवन वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सज्ज आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जुलै : भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवन इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये दुखापतीमुळं बाहेर पडला. दरम्यान आता 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यात शिखरला संधी देण्यात आली आहे. या दौऱ्याआधी धवन मैदानावर मेहनत करत आहे. मात्र यातच धवनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धवननं आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत भाजपच्या क्रेंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली.

वेस्ट इंडिज दौऱ्याकरिता सराव करत असलेल्या शिखरनं रविवारी अमेठीच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेतली. यावेळी स्मृती इराणी यांनी धवनसोबत पालकत्वाच्या मुल्यांवर चर्चा केली. दरम्यान या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळं चाहते धवनही भाजपमध्ये प्रवेश करणार आहे की काय, असा सवाल करत आहेत.

वाचा-वेस्ट इंडिज दौऱ्याआधी कर्णधार कोहलीनं घेतला 'पंगा'

याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभा निवडणूकही जिंकली. त्यामुळं चाहते शिखरही गंभीरच्या पाऊलावर पाऊल टाकणार का?, असा सवाल करत आहेत.

वाचा-भारतीय संघाचा कोच निवडण्यासाठी 'या' दिग्गजांची टीम सज्ज!

असा आहे वेस्ट इंडिजचा दौरा

वेस्ट इंडिज दौऱ्यात भारत तीन टी 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेपासून होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका 8 ऑगस्ट तर कसोटी मालिका 22 ऑगस्टला सुरू होणार आहे.

वाचा-टेस्ट वर्ल्ड कपच्या रणसंग्रामाला 1 ऑगस्टपासून सुरुवात, असे आहेत नियम

VIDEO: भावुक क्षण! ऑपरेश 'महालक्ष्मी'मध्ये माकडाचीही सुटका, NDRF जवानाला अश्रू अनावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 01:25 PM IST

ताज्या बातम्या