के.श्रीकांत, समीर वर्मा वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत

के.श्रीकांत, समीर वर्मा वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत

श्रीकांतने रशियाच्या सरगे गिरंटचा 21-13,21-12 असा दोन सेटमध्ये सरळ पराभव केला. तर समीर वर्माचा प्रतिस्पर्धी स्पेनचा पॅबिलो अबिनला दुखापत झाल्यामुळे समीर वर्माला दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला

  • Share this:

ग्लास्गो, 22 ऑगस्ट: बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची चांगली सुरुवात झाली आहे. किंदंबी श्रीकांत आणि समीर वर्मानं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

श्रीकांतने रशियाच्या सरगे गिरंटचा 21-13,21-12 असा दोन सेटमध्ये सरळ पराभव केला. तर समीर वर्माचा प्रतिस्पर्धी स्पेनचा पॅबिलो अबिनला दुखापत झाल्यामुळे समीर वर्माला दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला आहे. पहिला सेट समीरनं 21-8 जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये पॅबिलो दुखापतग्रस्त झाला.

तर पी.व्ही.सिंधू आणि सायना नेहवाल यांच्या पहिल्या फेरीचे सामने आज होतील. पी.व्ही.सिंधूची पहिल्या फेरीत कोरियाच्या किम .ह्यो .मिनशी आज लढत आहे. तेव्हा कालप्रमाणेच आजही सायना आणि सिंधू आज भारताला विजय मिळवून देतात की नाही याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

First published: August 22, 2017, 10:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading