मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Independence Day: खेळांच्या मैदानात तिरंगा फडकवणाऱ्या क्रीडापटूंकडून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!

Independence Day: खेळांच्या मैदानात तिरंगा फडकवणाऱ्या क्रीडापटूंकडून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!

क्रीडापटूंकडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

क्रीडापटूंकडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

Independence Day: देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. याच निमित्तानं आज 76व्या स्वातंत्र्यदिनी क्रीडाविश्वात भारतीय तिरंगा अभिमानानं फडकवणाऱ्या भारतीय क्रीडापटूंनीही देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

    मुंबई, 15 ऑगस्ट: आपला भारत देश ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र होऊन आज 75 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्तानं आपण संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. याच 76व्या स्वातंत्र्यदिनी क्रीडाविश्वात भारतीय तिरंगा अभिमानानं फडकवणाऱ्या भारतीय क्रीडापटूंनीही देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, मिताली राज, राष्ट्रकुल सुवर्णविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू, साक्षी मलिक, बॉक्सर मेरी कोम, बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, पी. व्ही. सिंधू यांच्यासह सोशल मीडियातून अनेक क्रीडापटूंनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. हेही वाचा - Cheteshwar Pujara: पुजाराच्या बॅटमधून धावांचा पाऊस, रॉयल लंडन वन डे कपमध्ये सलग दुसरं शतक मोदींकडून क्रीडापटूंचं कौतुक आज लाल किल्ल्यावर झालेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनीही क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात खेळाडूंच्या निवड प्रक्रियेतील पारदर्शकतेमुळे भारताचा तिरंगा प्रत्येक खेळात फडकतोय असंही मोदी म्हणाले.
    Published by:Siddhesh Kanase
    First published:

    Tags: Independence day, Sports

    पुढील बातम्या