समलैंगिक संबंध ठेवशील तर घरातून बाहेर काढू, द्युती चंदला बहिणीची धमकी

समलैंगिक संबंध ठेवशील तर घरातून बाहेर काढू, द्युती चंदला बहिणीची धमकी

भारताची धावपटू द्युती चंदने समलैंगिक असल्याचा खुलासा केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 मे : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला दोन रौप्य मिळवून देणाऱी धावपटू द्युती चंदने एका मुलाखतीत तिच्या जीवनाबद्दल खुलासा केला. आपले काही वर्षांपासून समलैंगिक संबंध असल्याचं सांगितलं आहे. द्युती चंद म्हणाली की, गावातच असलेल्या मैत्रिणीसोबत माझे संबंध असून तिची ओळख सांगणार नाही. विनाकारण ती लोकांच्या नजरेत येणं मला पसंद नाही.

मात्र द्युतीच्या समलैंगिक संबंधांवर तिच्या मोठ्या बहिणीने नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर घरातून बाहेर काढण्याची आणि तुरुंगात पाठवू अशी धमकी बहिणीने दिल्याचं द्युतीने सांगितंल. तिला भावाची बायको आवडली नाही म्हणून भावाला घराबाहेर काढलं आणि आता मला बाहेर काढण्याची धमकी दिली. पण मी सज्ञान असून माझे निर्णय घेऊ शकते यासाठीच या नात्याबद्दल सांगण्याचा निर्णय घेतला.

द्युती चंदने सांगितलं की, मला कोणी अशी व्यक्ती मिळाली आहे जिच्यावर जीव आहे. मला वाटतं की प्रत्येकाला नात्याचं स्वातंत्र्य असावं. मी नेहमीच समलैंगिक संबंध असलेल्या लोकांच्या अधिकारासाठी प्रयत्न केले. सध्या माझं लक्ष वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिकवर असून भविष्यात मला तिच्यासोबतच रहायला आवडेल.

गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 वर ऐतिहासिक निर्णय दिला. माझं स्वप्न होतं की मला असा साथीदार मिळावा जो मला आयुष्यभर साथ देईल. मला खेळाडू म्हणून प्रेरणा देईल. मी गेल्या 10 वर्षांपासून धावत आहे आणि पुढची 5 ते 7 वर्ष खेळेन. अशावेळी मला कोणाचीतरी साथ हवी असंही द्युती चंदने म्हटलं आहे.

द्युती चंदने आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. तीने 11.28 सेकंदाची वेळ नोंदवत रौप्य पदक पटकावलं होतं. आगामी वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि टोकियो ऑलिम्पिक 2020 साठी तिचा सराव सुरू आहे.

VIDEO: द्वारका मेट्रो स्टेशनजवळ अंदाधुंद गोळीबार, दोघांचा मृत्यू

First published: May 20, 2019, 9:05 AM IST
Tags: india

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading