Asia Cup 2018 : जेव्हा चक्क मैदानातच भांडले भारत-पाकिस्तानचे ‘हे’ खेळाडू

शाहिदने जाणूनबुजून असं केल्याचा आरोप गंभीरने केला. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता.

News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2018 04:09 PM IST

Asia Cup 2018 : जेव्हा चक्क मैदानातच भांडले भारत-पाकिस्तानचे ‘हे’ खेळाडू

एशिया कपमधील सर्वात मोठ्या सामन्याला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश जिंकण्यासाठी मैदानात उतरतील. भारताने आतापर्यंत सहावेळा एशिया कप जिंकला आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमधील सामन्यापेक्षा मैदानावरील वाद चांगलेच गाजले. चला तर मग एक नजर टाकूयात या दोन्ही देशातील खेळाडूंच्या मैदानातील वादांवर.

गौतम गंभीर आणि कामरान अकमल- २०१० मध्ये झालेल्या एशिया कपमध्ये पाकिस्तानचा यष्टिरक्षक कामरान अकमलने भारताचा फलंदाज गौतम गंभीरला त्रास देण्यासाठी त्याच्या विरोधात गरज नसताना अपिल केलं. नेमकी याच गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाला होता.

हरभजन सिंग आणि शोएब अख्तर- २०१० एशिया कपमध्ये भारताला पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकण्यासाठी शेवटच्या ७ चेंडूत ७ धावांची गरज होती. अशावेळी पाकिस्तानचा जलद गोलंदाज शोएब अख्तरने भारताचा खेळाडू हरभजनला चिथवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर हरभजनने शानदार षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला.

गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी- २००७ मध्ये जेव्हा पाकिस्तानचा संघ भारत दोऱ्यावर आला होता तेव्हा ५ एक दिवसीय सामन्यांपैकी तिसऱ्या सामन्यात गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदीमध्ये चांगलाच वाद झाला होता. जेव्हा शाहिदच्या ब़ॉलवर गंभीरने सिंगल घेण्यासाठी पळाला तेव्हा दोघांची टक्कर झाली. शाहिदने जाणूनबुजून असं केल्याचा आरोप गंभीरने केला. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता.

वीरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तर- २००३ मध्ये वीरेंद्र सेहवाग बाद होण्यासाठी शोएब अख्तर एका मागोमाग एक बाऊंसर टाकत होता. शोएबच्या अशा गोलंदाजीमुळे सेहवाग भडकला आणि त्याच्या जवळ जाऊन बोलला, हिंम्मत असेल तर नॉन स्ट्राइकरवर असलेल्या सचिनला बाऊंसर टाक. त्यानंतर शोएबच्या बाऊंसरवर सचिनने षटकार ठोकला. तेव्हा सेहवाग म्हणाला, ‘बाप बाप होता है और बेटा बेटा होता है.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2018 04:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...