मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /रवींद्र जडेजा घेणार निवृत्ती! समोर आलं धक्कादायक कारण

रवींद्र जडेजा घेणार निवृत्ती! समोर आलं धक्कादायक कारण

भारतीय क्रिकेटमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja Retire) टेस्ट क्रिकेटमधून (Test Cricket) निवृत्ती घ्यायची शक्यता आहे.

भारतीय क्रिकेटमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja Retire) टेस्ट क्रिकेटमधून (Test Cricket) निवृत्ती घ्यायची शक्यता आहे.

भारतीय क्रिकेटमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja Retire) टेस्ट क्रिकेटमधून (Test Cricket) निवृत्ती घ्यायची शक्यता आहे.

मुंबई, 14 डिसेंबर : भारतीय क्रिकेटमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja Retire) टेस्ट क्रिकेटमधून (Test Cricket) निवृत्ती घ्यायची शक्यता आहे. भारताच्या सगळ्यात फिट खेळाडूंपैकी एक असलेला जडेजा टेस्ट टीमचा अविभाज्य भाग आहे. डावखुरा स्पिनर असलेल्या जडेजाने भारताला अनेक मॅच जिंकवून दिल्या, याशिवाय त्याची बॅटिंगही टीम इंडियासाठी कठीण वेळी कामाला आली आहे. याशिवाय जडेजा उत्कृष्ट फिल्डरही आहे. जडेजाची ही ऑलराऊंड क्षमता कॅप्टनसाठी कायमच दिलासादायक असते. अनेकवेळा परदेश दौऱ्यात विराट कोहली (Virat Kohli) अश्विनऐवजी जडेजालाच प्लेयिंग इलेव्हनमध्ये पसंती देतो.

वनडे आणि टी-20 मधलं करियर जास्त काळ चालावं म्हणून रवींद्र जडेजा टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायची शक्यता आहे. जडेजाच्या टीममधल्याच एकाने दैनिक जागरणशी बोलताना तो टेस्ट क्रिकेटला अलविदा करू शकतो, असं सांगितलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजवेळी (India vs New Zealand) जडेजाच्या हाताला दुखापत झाली होती, त्यामुळे तो अखेरची टेस्ट खेळू शकला नव्हता. या दुखापतीमुळे त्याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीही (India tour of South Africa) निवड झाली नाही.

टेस्ट क्रिकेटमध्ये जडेजाने 57 सामन्यांमध्ये 33.76 च्या सरासरीने 2,195 रन केले, यात एका शतकाचा समावेश आहे. याशिवाय बॉलिंगमध्ये त्याने 25 पेक्षा कमीच्या सरासरीने आणि 2.41 च्या इकोनॉमी रेटने 232 विकेट घेतल्या आहेत. जडेजा टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 200 विकेट घेणारा डावखुरा बॉलर ठरला होता. 2019 साली 44 व्या सामन्यात जडेजाने हा विक्रम केला होता.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये टीम इंडिया 3 टेस्ट आणि 3 वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. 26 डिसेंबरपासून पहिल्या टेस्टला सुरुवात होणार आहे. जडेजाशिवाय रोहित शर्मा, शुभमन गिल आणि अक्षर पटेलही दुखापतीमुळे टेस्ट सीरिज खेळू शकणार नाही. जडेजा आणि अक्षर नसल्यामुळे अश्विन टेस्ट सीरिजमध्ये खेळेल, हे निश्चित मानलं जातं.

First published:

Tags: Ravindra jadeja