'दंगल गर्ल'च्या हाती भाजपचे कमळ! विधानसभेसाठी मिळणार तिकीट?

'दंगल गर्ल'च्या हाती भाजपचे कमळ! विधानसभेसाठी मिळणार तिकीट?

हरियणातील विधानसभा निवडणुकांआधी जननायक जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

  • Share this:

हरियाणा, 12 ऑगस्ट : हरियणातील विधानसभा निवडणुकांआधी जननायक जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कुस्तीपटू महावीर फोगट आणि दबंग गर्ल बबीता फोगाट यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. बबीता आणि महावीर यांनी केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप नेता अनिल जैन, रामविलास शर्मा आणि अनिल बलूनी उपस्थित होते. दरम्यान, महावीर किंवा बबीता फोगाट यांना भाजपकडून विधानसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

मोदी सरकारने जम्मू-काश्मीर राज्यातून कलम 370 हटवल्यानंतर बबीतानं सरकारचे कौतुक केले होते. केंद्र सरकारनं हा नियम हटवल्यामुळं काश्मीरमधील दहशतवादाला आळा बसेल, असेही मत बबीतानं व्यक्त केले होते. कुस्तीमध्ये जगभरता भारताचा झेंडा उंचावणारी बबीता पक्षात सामिल झाल्यानंतरही खेळू शकणार आहे. यावेळी बबीतानं, "माझ्या शैलीचा वापर मी, क्रीडा मंत्रालयातही करेन", अशी हमी क्रिडा मंत्री किरण रिजीजू यांना दिली. महावीर फोगट आणि बबीता यांच्या पक्ष प्रवेशानंतर भाजप राज्यसभा अनिल जैन यांनी, "आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळं देशाची प्रगतीच होत आहे, यात सर्वच आपलं योगदान देत आहेत”, असे मत व्यक्त करत या दोघांचे पक्षात स्वागत केले.

वाचा-नावही न ऐकलेल्या संघानं मोडला ऑस्ट्रेलियाचा विश्वविक्रम, ICC ने केलं ट्वीट

वाचा-क्रिकेट होणार आणखी स्मार्ट, हे आहेत मायक्रोचिप असलेल्या चेंडूचे फायदे

पंतप्रधान मोदींकडून मिळते प्रेरणा

महावीर फोगाट यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. महावीर यांनी, “मोदी यांनी उत्तम काम केले आहे. गृहमंत्री अमित शहा कलम 370 हटवण्याता ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळं देश एकजुट होणार आहे. पंतप्रधान मोदींकडून नेहमीच प्रेरणा मिळते”, असे मत व्यक्त केले.

मोदींची मी खुप मोठी फॅन

यावेळी बबीतानं पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे कौतुक करत “मी मोदींची खुप मोठी फॅन आहे”, असे सांगितले. “कलम 370 हटवल्यामुळं मला आनंद झाला, मोदींनी इतिहासांच्या पानावर याची सुवर्ण अक्षरात नोंद केली आहे”, असेही मत व्यक्त केले.

वाचा-विजयानंतरही टीम इंडियाची वाढली डोकेदुखी, ही आहेत 3 कारणं

केक कापावा इतक्या सहज पाडली इमारत, पाहा घटनास्थळावरचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2019 02:12 PM IST

ताज्या बातम्या