महिली टी-२० क्रिकेट मालिकेत भारताची आफ्रिकेवर विजयी सलामी

महिली टी-२० क्रिकेट मालिकेत भारताची आफ्रिकेवर विजयी सलामी

या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

  • Share this:

14 फेब्रुवारी : वन-डे मालिकेतील विजयापाठोपाठ भारतीय महिला संघाने मंगळवारी टी-२० क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात विजयी सलामी दिली. कॅप्टन मिताली राजचे नाबाद अर्धशतक आणि तिला अन्य फलंदाजांची मिळालेली तोलामोलाची साथ यामुळे भारताने आफ्रिकेचे आव्हान ७ चेंडू आणि ७ विकेट राखून पार केले.

या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १६४ धावा केल्या.

भारताने १८.३ षटकांमध्ये आफ्रिकेला १३० धावांत रोखले होते. मात्र, अखेरच्या टप्प्यात क्लोई ट्रायनने अवघ्या ७ चेंडूंमध्ये २ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ३२ धावा फटकावून संघाला १६० धावांचा टप्पा ओलांडून दिला. शिखा पांडेच्या अखेरच्या षटकात तब्बल २३ धावा फटकावण्यात आल्या.

First published: February 14, 2018, 8:17 AM IST

ताज्या बातम्या