मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs SA ODI: अखेर हा मराठमोळा खेळाडू टीम इंडियात, लखनौ वन डेत होणार 40-40 ओव्हर्सचा खेळ

Ind vs SA ODI: अखेर हा मराठमोळा खेळाडू टीम इंडियात, लखनौ वन डेत होणार 40-40 ओव्हर्सचा खेळ

भारत आणि दक्षिण आफ्रिका पहिली वन डे

भारत आणि दक्षिण आफ्रिका पहिली वन डे

Ind vs SA ODI: या सामन्यासाठी मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडला अखेर संघात स्थान मिळालं आहे. दरम्यान पावसामुळे हा सामना 40-40 ओव्हर्सचा होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

लखनौ, 6 ऑक्टोबर: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात होणाऱ्या पहिल्या वन डे सामन्यात अखेर पावसानं कृपा केली आहे. लखनौतल्या इकाना स्टेडियममध्ये खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात सुरुवातीलाच पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे जवळपास दोन तासांचा खेळ वाया गेला. पण अखेर या सामन्याची नाणेफेक झाली असून भारतानं टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. या सामन्यासाठी मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडला अखेर संघात स्थान मिळालं आहे. दरम्यान पावसामुळे हा सामना 40-40 ओव्हर्सचा होणार आहे.

भारतीय संघ- धवन, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, संजू सॅमसन, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, सिराज, आवेश खान

हेही वाचा - T20 World Cup: मॅच फिनिशर की पॉवर प्ले स्पेशालिस्ट? वर्ल्ड कपमध्ये या बॅट्समनचा काय असणार रोल?

ऋतुराज-रवी बिश्नोईचं पदार्पण

झिम्बाब्वे दौऱ्यात वन डे पदार्पणाची आस लावून बसलेल्या महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडचं स्वप्न अखेर साकार झालं. त्यानं लखनौमध्ये टीम इंडियाकडून वन डे पदार्पण केलं. ऋतुराजसह लेग स्पिनर रवी बिश्नोईदेखील लखनौमध्ये आपला पहिला वन डे सामना खेळणार आहे.

हेही वाचा - Cricket: IPL खेळलेल्या या क्रिकेटरला अटक, बलात्काराचा गंभीर आरोप; पाहा काय आहे प्रकरण?

पावसामुळे खेळ उशीरानं सुरु

दरम्यान पावसामुळे आजच्या सामन्यात खेळ जवळपास दोन तास उशीरानं सुरु झाला. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभर लखनौमध्ये पावसाची रिपरिप सुरुच असणार आहे. त्यामुळे सामन्यादरम्यान पावसाचा पुन्हा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. दरम्यान हा सामना 40-40 ओव्हर्सचा होणार असून 8 ओव्हर्सचा पॉवर प्ले राहील.

First published:

Tags: Cricket news