मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs SA: तिरुअनंतपूरममध्ये भारतानं जिंकला टॉस, पाहा रोहितनं टीममध्ये कुणाला दिली संधी?

Ind vs SA: तिरुअनंतपूरममध्ये भारतानं जिंकला टॉस, पाहा रोहितनं टीममध्ये कुणाला दिली संधी?

भारत वि. दक्षिण आफ्रिका पहिली टी20

भारत वि. दक्षिण आफ्रिका पहिली टी20

Ind vs SA: या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार रोहित आणि भारतीय संघव्यवस्थापनानं या सामन्यासाठी संघात अनेक महत्वाचे बदल केले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

तिरुअनंतपूरम, 28 सप्टेंबर: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातला पहिला टी20 सामना आज तिरुअनंतपूरममध्ये खेळवण्यात येत आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपआधी भारतीय संघाची ही शेवटची टी20 मालिका आहे. त्यामुळे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी टीम इंडियाकडे ही शेवटची सर्वात मोठी संधी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या तीन टी20 सामन्यानंतर भारतीय संघ थेट वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध आपला सामना खेळणार आहे.

दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार रोहित आणि भारतीय संघव्यवस्थापनानं या सामन्यासाठी संघात अनेक महत्वाचे बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या अष्टपैलू हार्दिक पंड्याला या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याजागी रिषभ पंतला संघात जागा मिळाली आहे.

भारतीय प्लेईंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेट किपर), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, दीपक चहर, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल

बुमराला विश्रांती

जसप्रीत बुमरालाही या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी वर्ल्ड कप संघात स्टँड बाय असलेल्या दीपक चहरला संघात स्थान मिळालंय. तर आशिया कपमध्ये टीम इंडियाकडून प्रभावी मारा करणारा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगचं संघात पुनरागमन झालं आहे. दुसरीकडे लेग स्पिनर युजवेंद्र चहलऐवजी रोहितनं रवीचंद्रन अश्विनला संधी देण्यात आली आहे.

First published:

Tags: Sports, T20 world cup 2022