दिव्यांग क्रिकेट वर्ल्ड कप भारतानं जिंकला, यजमान इंग्लंडचा उडवला धुव्वा!

दिव्यांग क्रिकेट वर्ल्ड कप भारतानं जिंकला, यजमान इंग्लंडचा उडवला धुव्वा!

दिव्यांग टी20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानं सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला तर फायनलमध्ये इंग्लंडला पराभूत करून विजेतेपद पटकावलं.

  • Share this:

लंडन, 14 ऑगस्ट : दिव्यांग टी 20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये यजमान इंग्लंडला पराभूत करून भारताच्या संघाने विजतेपद पटकावलं. भारताच्या रवींद्र संतेचं अर्धशतक आणि कपणाल फणसे यांच्या अष्टपैलू खेळीच्या जो धावा केल्या होत्या. भारताकडून रवींद्र संतेनं 53 धावा तर कुणाल फणसेनं 36 धावांची खेळी केली. इंग्लंडच्या लिआम ओब्रायनने 35 धावांत 2 गडी बाद केले. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 20 षटकांत 9 बाद 144 धावांपर्यंत मजल मारू शकला.

यजमान इंग्लंडला भारतानं सुरुवातीलाच दणका दिला. सलामीवीर जेमी गुडविन 17 धावांवर बाद झाला. सनी गोयतनं त्याला बाद केलं. त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी अँगुस ब्राऊन आणि कॅलम फ्लीन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 66 धावांची भागिदारी केली. ही जोडीसुद्धा सनीनेच फोडली. त्यानंतर कुणालनं इंग्लंडचे दोन फलंदाज एकाच षटकात बाद केले. पहिल्या दोन विकेट गमावल्यानंतर इंग्लंडची घसरगुंडी उडाली. 129 धावांत त्यांचे 9 गडी तंबूत परतले होते. मात्र, शेवटच्या जोडीने सावध खेळ करत विजय लांबवला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताच्या रवींद्रनं 34 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. यात 4 षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. त्यानंतर कुणाल फणसे आणि विक्रामत केणी यांनी तिसऱ्या गड्यासाठी 67 धावांची भागिदारी केली. कुणालनं 36 तर विक्रांतनं 29 धावा केल्या. अखेरच्या षटकात सुग्नेश महेंद्रनने 11 चेंडूत 4 षटकारांच्या सहाय्यानं 33 धावांची वेगवान खेळी केली.

भारतानं सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला पराभूत करून फायनलमध्ये धडक मारली होती. सेमीफायनलच्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने दिलेलं 151 धावांचं आव्हान भारतानं 2 गडी राखून पार केलं होतं. या सामन्यात कुणाल फणसेनं अर्धशतकी खेळी केली होती.

VIDEO: 'माझ्या धन्या, मी दम सोडला पण...' मनाला चटका लावणारी कविता!

Published by: Suraj Yadav
First published: August 14, 2019, 11:12 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading