भारताचा ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सनं शानदार विजय,मालिकाही जिंकली

इंदूर वनडेत भारतानं ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सनं पराभव करीत वन-डे मालिका खिशात घातलीये.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2017 10:04 PM IST

भारताचा ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सनं शानदार विजय,मालिकाही जिंकली

24 सप्टेंबर : इंदूर वनडेत भारतानं ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सनं पराभव करीत वन-डे मालिका खिशात घातलीये. पाहुण्या संघानं पहिल्यांदा फलंदाजीला येत 294 धावांचं लक्ष्य दिलं होतं. भारतीय संघानं आक्रमक फलंदाजी करीत 5 विकेट्स आणि 2 ओव्हर राखून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

हार्दिक पंड्याच्या 78, रोहित शर्माच्या 71 आणि अजिंक्य रहाणेच्या धडाकेबाज 70 धावांच्या जोरावर भारतानं कांगारुंनी दिलेलं लक्ष्य सहज पार केलं. भारतानं हा विजय नोंदवतानाच मालिका 3-0 अशी खिशात घातलीये. आता पुढचे दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश देण्याचा भारताचा प्रयत्न राहणार आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2017 09:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...