घरचे दागिने विकले, उधारीने पैसे घेतले आणि भारताला जिंकून दिला वर्ल्ड कप

घरचे दागिने विकले, उधारीने पैसे घेतले आणि भारताला जिंकून दिला वर्ल्ड कप

संघ तयार केला तरी त्यासाठी एकही उद्योगपती प्रायोजक म्हणून पुढे आला नाही तेव्हा दागिने विकले. त्याच संघानं भारताला इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप जिंकून दिला.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघानं पहिल्या वर्ल्ड कपवर नाव कोरलं. याचं श्रेय रवि चौहानला जातं. लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. मात्र, सर्वसामान्य मुलं दिव्यांग असल्यानं त्याच्यासोबत खेळायला घेत नसत. त्यावेळी दिव्यांग खेळाडूंसाठी वेगळी जागा तयार करण्याचा निर्धार त्यानं केला. त्याच्या जिद्दीचं, परिश्रमाचं फळ म्हणूनच भारतानं दिव्यांगांसाठी पहिला वर्ल्ड कप जिंकला. देशभर फिरून प्रतिभावान खेळाडूंची निवड केली. त्यानंतर माजी क्रिकेटपटूंच्या मदतीनं एक चांगला संघ तयार केला. त्यामुळंच भारतानं विजय मिळवला. रवि चौहान हा भारताच्या दिव्यांग क्रिकेट असोसिएशनचा महासचिव आहे.

फरीदाबादमध्ये राहणाऱ्या रवि चौहानला क्रिकेटपटू व्हायचं होतं पण घरच्या परिस्थितीनं स्वप्नांपासून दूर ठेवलं. घरापासून लांब अंतरावर असलेल्या मैदानावर पोहचण्यासाठी एकवेळ मित्रांकडून उधारीनं पैसे घ्यायला लागायचे. मात्र परिस्थितीपुढे गुडघे टेकावे लागले. त्यावेळी मनात ठरवलं की आपल्यासोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये.

2011 मध्ये माजी क्रिकेटपटूंच्या मदतीनं रवी चौहानने दिव्यांग क्रिकेटपटूंच्या असोसिएशनची स्थापना केली. त्यानंतर अनेक ठिकाणी शिबिरं घेऊन खेळाडूंची निवड केली. 2012 मध्ये भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तान दौरा केला. या दौऱ्यात पहिल्यांदा सॉफ्ट बॉलऐवजी लेदर बॉल वापरण्यात आला. रविचं म्हणणं होतं की लेदर बॉलमुळे दिव्यांग क्रिकेपटूंनासुद्धा खेळण्यासाठी उत्साह संचारेल. त्यानंतर दिव्यांग क्रिकेटपटूंसाठी खास पॅड आणि ग्लोव्हज तयार करून घेतले.

दिव्यांग क्रिकेट संघ तयार करत असताना एकही प्रायोजक मिळत नव्हता. राष्ट्रीय संघाला अनेक उद्योगपती पुढे येतात पण या संघासाठी मात्र स्थिती वेगळी होती. तेव्हा घरातील दागिने गहाण ठेवले. मुलांची शाळेची फीसुद्धा मित्रांकडून उसने पैसे घेऊन भरावी लागली. दरम्यान, इकडं भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघाने 2016 मध्ये अफगाणिस्तान दौऱा केला. या दौऱ्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने शुभेच्छा दिल्या होत्या.

परदेशात वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या रविला यासाठी फार काळ वाट बघावी लागली नाही. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दिव्यांग क्रिकेटपटूंचे आयुष्य सुधारण्याची आशा आहे. खेळाडूंना सरकारी नोकरी आणि आर्थिक मदत मिळण्यास सोपं जाईल असं रवि यांना वाटतं. त्यांचं हे काम सुरू राहिल असं रवि म्हणाले.

कपडे काढून दाखवू का? पुण्यात दारूड्या महिलेची पोलिसांनाच शिवीगाळ पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 22, 2019 07:21 AM IST

ताज्या बातम्या