News18 Lokmat

कांगारूंना लोळवलं,टीम इंडिया नंबर वन!

नागपूर वन-डे सह टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका ४-१ अशी जिंकलीये. नागपूरमध्ये झालेल्या शेवटच्या वन-डेमध्ये भारतानं ७ विकेट्सनी विजय मिळवला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2017 09:10 PM IST

कांगारूंना लोळवलं,टीम इंडिया नंबर वन!

01 आॅक्टोबर : नागपूर वन-डे सह टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका ४-१ अशी जिंकलीये. नागपूरमध्ये झालेल्या शेवटच्या वन-डेमध्ये भारतानं ७ विकेट्सनी विजय मिळवला. पहिल्यांदा बॅटिंग करताना, ऑस्ट्रेलियानं ५० ओव्हर्समध्ये २४२ रन्स केले. भारतीय स्पिनर्सपुढे ऑस्ट्रेलियाचे बॅट्समन टिकू शकले नाही.अक्सर पटेलनं ३ विकेट्स घेतल्या.तर जसप्रित बूमरानं २ विकेट्स घेतल्या.

२४३ रन्सचं टार्गेट घेऊन उतरलेल्या टीम इंडियानं दमदार सुरुवात केली. पहिल्या विकेट्साठी रहाणे आणि रोहित शर्मानं १२४ रन्सची पार्टनरशिप केली.रोहित शर्मानं १२४ रन्सची धमाकेदार इनिंग खेळली.तर अजिंक्य रहाणेनं ६१ रन्स केलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 1, 2017 08:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...