News18 Lokmat

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताचा 'विराट' विजय

दाम्बुला वन-डेमध्ये टीम इंडियानं 9 विकेट्सनं विजय मिळवलंय. 217 रन्सचा पाठलाग करतांना टीम इंडियानं 29 ओव्हरमध्येच टार्गेट पार केलं.शिखर धवनचं धमाकेदार सेंच्युरी आणि विराट कोहलीच्या 82 रन्सच्या जोरावर टीम इंडियानं एकतर्फी विजय मिळवला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2017 09:05 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताचा 'विराट' विजय

20 आॅगस्ट : श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या वनडेत भारतानं 'विराट' विजय मिळवला आहे. दाम्बुला वन-डेमध्ये टीम इंडियानं 9 विकेट्सनं  विजय मिळवलंय. 217 रन्सचा पाठलाग करतांना टीम इंडियानं 29 ओव्हरमध्येच टार्गेट पार केलं.शिखर धवनचं धमाकेदार सेंच्युरी आणि विराट कोहलीच्या 82 रन्सच्या जोरावर टीम इंडियानं एकतर्फी विजय मिळवला.

टॉस जिंकून भारतानं पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या ओपनर्सनी जबरदस्त सुरुवात केली. डिकवेल्ला,गुणथिलका आणि मेंडिस आणि लंकेला चांगली सुरुवात करुन दिली.19 ओव्हर्समध्ये लंकेनं एक विकेट गमावत 100 रन्स केले होते.

श्रीलंका एक चांगला स्कोअर उभा करेल असं वाटत असतानाच 139 रन्सवर डिकवेल्ला आऊट झाला. आणि त्यानंतर श्रीलंकेची टीम सावरू शकली नाही.मॅथ्यूज आणि थरांगा वगळता तळाचा कुठलाही बॅट्समन दोन अंकी धावसंख्या गाठू शकला नाही.श्रीलंकेनं 77 रन्समध्ये आठ विकेट गमावल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2017 09:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...