मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

स्मृती मंधानाचा Look पाहून कोण म्हणालं, 'ओ हसीना जुल्फों वाली'?

स्मृती मंधानाचा Look पाहून कोण म्हणालं, 'ओ हसीना जुल्फों वाली'?

भारतीय महिला क्रिकेटमध्ये आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डे-नाईट टेस्टमध्ये (India Women vs Australia Women 1st Test) स्मृती मंधानाने (Smriti Mandhana Century) शतकी खेळी केली.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 1 ऑक्टोबर : भारतीय महिला क्रिकेटमध्ये आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डे-नाईट टेस्टमध्ये (India Women vs Australia Women 1st Test) स्मृती मंधानाने (Smriti Mandhana Century) शतकी खेळी केली. डे-नाईट टेस्टमध्ये शतक झळकावणारी स्मृती ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात फार वेळ वाया न घालवता शतक पूर्ण केलं. अखेर 127 रन काढून ती आऊट झाली. या खेळीत तिनं 22 फोर आणि 1 सिक्स लगावला. स्मृतीनं एलिसा पेरीच्या बॉलवर फोर लगावत तिचं टेस्ट क्रिकेटमधील पहिलं शतक पूर्ण केलं.

या खेळीनंतर स्मृती मंधानावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय क्रिकेटपटू हरलीन देओलनेही (Harleen Deol) स्मृतीच्या खेळीचंच नाही तर तिच्या लूकचंही कौतुक केलं आहे. एलेक्सा प्लीज प्लेओ हसीना जुल्फों वाली, असं ट्वीट हरलीनने केलं. याचसोबत तिने स्मृती मंधानाचा शतकानंतर हेल्मेट काढून बॅट उंचावतानाचा फोटो शेयर केला आहे.

स्मृती मंधानाच्या या खेळीमुळे भारताचा स्कोअर दुसऱ्या दिवसाच्या शेवटी 276/5 असा झाला आहे. दीप्ती शर्मा 12 रनवर आणि तानिया भाटिया शून्य रनवर खेळत आहे. भारतीय महिला टीमच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ही एकमेव टेस्ट आहे. यापूर्वी झालेली तीन वन-डे सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियानं 2-1 नं जिंकली आहे.

आक्रमक बॅटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मृतीची ही चौथीच टेस्ट आहे. तिनं यापूर्वी इंग्लंड दौऱ्यात ब्रिस्टल टेस्टमध्ये 78 रनची खेळी केली होती. स्मृतीनं आजवर 62 वन-डेमध्ये जवळपास 42 च्या सरासरीनं 2377 रन काढले आहेत. यामध्ये 4 शतक आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 81 टी20 मॅचमध्ये 13 अर्धशतकासह 1901 रन काढले आहेत. या प्रकारातील तिचा स्ट्राईक रेट 121 आहे.

स्मृती मंधानाची ऐतिहासिक खेळी, भारतीय क्रिकेटला मिळाली 'Goddess of the offside'

First published: