वेलिंग्टन, 06 फेब्रुवारी: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव झाला. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने 159 धावा केल्या होत्या. पण भारतीय संघाचा 136 धावातच ऑलआऊट झाला. पहिल्या सामन्यात 24 धावांनी विजय मिळवत न्यूझीलंडने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 4 बाद 159 धावा केल्या. न्यूझीलंडकडून सोफी डीव्हाईन हिने सर्वाधिक 62 धावांची खेळी केली.
विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. प्रिया पुनिया केवळ 4 धावा करुन बाद झाली. त्यानंतर स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. या जोडीने भारताच्या विजयाचा पाया रचला होता. पण स्मृती मानधना 58 धावांवर बाद झाली आणि पूर्ण सामनाच न्यूझीलंडच्या बाजूने फिरला. स्मृती बाद झाली तेव्हा भारताची अवस्था 2 बाद 102 अशी होती. त्यानंतर भारतीच्या 8 फलंदाज केवळ 34 धावात बाद झाले. भारताच्या केवळ तिघा फलंदाजांना दुहेरी धावसंख्या करता आली.
VIDEO : कुंभमेळ्यात साधूंच्या तंबूला आग, 500-2000 च्या नोटा जळून खाक