IND vs ENG : स्मृती मंधानाने केली मोठी चूक, भारताला किंमत मोजावी लागणार!

IND vs ENG : स्मृती मंधानाने केली मोठी चूक, भारताला किंमत मोजावी लागणार!

भारतीय महिला क्रिकेट टीम (Indian Womens Team) 7 वर्षानंतर टेस्ट मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरली आहे. भारतीय महिला टीमने शेवटची टेस्ट 2014 साली खेळली होती. यानंतर आता भारत आणि इंग्लंड (India Women vs England Women) यांच्यात ब्रिस्टलमध्ये सीरिजच्या एकमेव टेस्टला सुरुवात झाली आहे.

  • Share this:

ब्रिस्टल, 16 जून : भारतीय महिला क्रिकेट टीम (Indian Womens Team) 7 वर्षानंतर टेस्ट मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरली आहे. भारतीय महिला टीमने शेवटची टेस्ट 2014 साली खेळली होती. यानंतर आता भारत आणि इंग्लंड (India Women vs England Women) यांच्यात ब्रिस्टलमध्ये सीरिजच्या एकमेव टेस्टला सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण दिवसाच्या सुरुवातीलाच स्मृती मंधानाने मोठी चूक केली.

सातव्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) इंग्लंडची ओपनर विनफिल्ड हिलचा सोपा कॅच सोडला. झूलन गोस्वामीच्या (Jhulan Goswami) बॉलिंगवर विनफिल्डच्या बॅटची कडा घेऊन बॉल पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या स्मृतीच्या हातात गेला, पण तिला हा अगदी सहज असलेला कॅच पकडता आला नाही. आता विनफिल्ड हिल हिचा सुटलेला कॅच भारताला किती महागात पडतो, हे लवकरच कळेल.

या सामन्यातून शेफाली वर्माने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. शेफाली वर्मा भारताकडून लहान वयात पदार्पण करणारी तिसरी महिला क्रिकेटपटू आहे. शेफालीचं वय 17 वर्ष 139 दिवस आहे. रजनी वेणुगोपालने 15 वर्ष 283 दिवस आणि सुलक्षणा कुलकर्णी यांनी 17 वर्ष 104 दिवसांचे असताना पहिली टेस्ट खेळली होती.

भारतीय महिला टीम

स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, पूनम राऊत, मिताली राज, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, तानिया भाटिया, झूलन गोस्वामी, पूजा वस्त्रकार, शिखा पांडे

इंग्लंडची टीम

टॅमी ब्युमोंट, लॉरेन विनफिल्ड हिल, हिथर नाईट, नॅट स्किवेर, एमी जोन्स, सोफिया डंकली, जॉर्जिया एलविस, कॅथरीन ब्रंट, सोफी एक्सेलेटन, आनया श्रुबसोले, कॅट क्रॉस

Published by: Shreyas
First published: June 16, 2021, 5:08 PM IST

ताज्या बातम्या