IND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलो ऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी

ब्रिस्टलमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये भारतीय महिला टीमनी (India vs England) अविश्वसनीय कामगिरी केली आहे. इंग्लंडने फॉलोऑन दिल्यानंतरही टीम इंडियाला ही टेस्ट मॅच ड्रॉ करण्यात यश आलं. आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेली स्नेह राणा (Sneh Rana) हिने ऐतिहासिक कामगिरी करून इंग्लंडच्या हातातला विजयाचा घास हिसकावून घेतला.

ब्रिस्टलमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये भारतीय महिला टीमनी (India vs England) अविश्वसनीय कामगिरी केली आहे. इंग्लंडने फॉलोऑन दिल्यानंतरही टीम इंडियाला ही टेस्ट मॅच ड्रॉ करण्यात यश आलं. आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेली स्नेह राणा (Sneh Rana) हिने ऐतिहासिक कामगिरी करून इंग्लंडच्या हातातला विजयाचा घास हिसकावून घेतला.

  • Share this:
    ब्रिस्टल, 19 जून : ब्रिस्टलमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये भारतीय महिला टीमनी (India vs England) अविश्वसनीय कामगिरी केली आहे. इंग्लंडने फॉलोऑन दिल्यानंतरही टीम इंडियाला ही टेस्ट मॅच ड्रॉ करण्यात यश आलं. आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेली स्नेह राणा (Sneh Rana) हिने ऐतिहासिक कामगिरी करून इंग्लंडच्या हातातला विजयाचा घास हिसकावून घेतला. स्नेह राणाने 154 बॉलमध्ये नाबाद 80 रन केले. नवव्या आणि दहाव्या क्रमांकावरच्या शिखा पांडे (Shikha Pandey) आणि तानिया भाटीया (Taniya Bhatia) यांनी स्नेहला उत्कृष्ट साथ दिली. शिखा पांडेने 18 रन केले तर तानिया भाटीया 44 रनवर नाबाद राहिली. अखेरच्या इनिंगमध्ये भारताने 344/8 एवढा स्कोअर केला. पहिल्या इनिंगमध्ये 96 रनची खेळी करणारी शफाली वर्मा दुसऱ्या इनिंगमध्येही चमकली. शफालीने 83 बॉलमध्ये 63 रन केले, तर दीप्ती शर्मा 54 रन करून माघारी परतली. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर हीदर नाईटने 95 रन, सोफिया डंकलेने 74 रन आणि टॅमी ब्युमोंटने 66 रनची खेळी केली. या तिघींच्या अर्धशतकामुळे इंग्लंडने 396/9 वर डाव घोषित केला. भारताकडून स्नेह राणाने (Sneh Rana) 4 आणि दीप्ती शर्माने (Deepti Sharma) 3 विकेट घेतल्या. इंग्लंडने डाव घोषित केल्यानंतर भारतीय टीम बॅटिंगला आली, पण चांगल्या सुरुवातीनंतरही भारताची बॅटिंग गडगडली, त्यामुळे इंग्लंडने फॉलोऑन दिला. ब्रिस्टलमधल्या या टेस्टमध्ये भारताने एकही विकेट न गमावता 167 रन केले होते, पण यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे भारताची बॅटिंग कोसळली आणि टीम 231 रनवर ऑल आऊट झाली. भारताच्या या कामगिरीच्या शिल्पकार ठरलेल्या शफाली वर्मा (Shafali Varma) आणि स्नेह राणा यांची ही पहिलीच मॅच होती. 7 वर्षानंतर भारतीय टीम पहिल्यांदाच टेस्ट मॅच खेळली, याआधी 2014 साली भारताने अखेरची टेस्ट खेळली होती. भारतीय महिला टीमच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर अनेकांना भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात कोलकात्याच्या इडन गार्डनवर झालेल्या मॅचची आठवण झाली. ऑस्ट्रेलियाने भारताला फॉलो ऑन दिल्यानंतर लक्ष्मण (VVS Laxman) आणि द्रविड (Rahul Dravid) यांनी मॅरेथॉन खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता.
    Published by:Shreyas
    First published: