मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

4 चेंडूत 4 धावा हव्या असताना रोहित स्टाइल षटकार, हरमनप्रीतचा VIDEO पाहिलात का?

4 चेंडूत 4 धावा हव्या असताना रोहित स्टाइल षटकार, हरमनप्रीतचा VIDEO पाहिलात का?

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीतच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडला पाच गडी राखून पराभूत केलं.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीतच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडला पाच गडी राखून पराभूत केलं.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीतच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडला पाच गडी राखून पराभूत केलं.

  • Published by:  Suraj Yadav

मुंबई, 31 जानेवारी : भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या महिला टी20 तिरंगी मालिकेत खेळत आहे. यामध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीतच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडला पाच गडी राखून पराभूत केलं. हरमनप्रीतने नाबाद 42 धावा केल्या. भारताला विजयासाठी चार चेंडूत 4 धावांची गरज असताना तिने षटकार खेचून विजय मिळवून दिला.

इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 147 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताच्या राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे आणि दीप्ति शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर राधा यादवने एक विकेट घेतली.

इंग्लंडने दिलेलं 148 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. शेफाली वर्मा 30 तर जेमिमा रॉड्रिग्ज 26 आणि स्मृती मानधना 15 धावांवर बाद झाली. त्यानंतर मधल्या फळीत वेदा कृष्णमूर्ती 7 आणि तानिया भाटिया 11 धावांवर बाद झाल्या. त्यावेळी हरमनप्रीत कौर एका बाजूने फटकेबाजी करत होती.

अखेरच्या षटकात भारताला सहा धावांची गरज होती. त्यानंतर चार चेंडूत चार धावांची गरज असताना तिसऱ्या चेंडूवर हरमनप्रीतने रोहित शर्माने जसा षटकार मारला होता तसाच षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला. तिने नाबाद 42 धावा केल्या.

तत्पूर्वी, इंग्लंडच्या आघाडीच्या फळीला भारताच्या गोलंदाजांनी खिंडार पाडलं. अॅमी जोन्स आणि डॅनि वॅट दुहेरी धावसंख्या गाठू शकल्या नाहीत. त्यानंतर नताली स्कायवरने 20 धावा केल्या तर फ्रॉन विल्यन 7 धावांवर बाद झाली. इंग्लंडची कर्णधर हीथर नाइटने फटकेबाजी करताना 67 धावांची खेळी केली. तर टॅमी ब्यूमोंटनेही 37 धावा फटकावल्या.

‘स्वत:च्या फायद्यासाठी मला...’, धोनीने केले साक्षीवर गंभीर आरोप! VIDEO VIRAL

First published:

Tags: Cricket, Harmanpreet kaur