मुंबई, 12 मार्च : भारतीय महिला क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियात झालेल्या आयसीसी टी20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं. ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदाच फायनलला पोहोचलेल्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियानं 85 धावांनी पराभूत केल्यानं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं. टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकता आला नसला तरी देशातील चाहत्यांनी संघाला पाठिंबा देत शुभेच्छा दिल्या. मात्र हा पाठिंबा आणि शुभेच्छा एअरपोर्टवर दिसला नाही. महिला खेळाडूंचे विमानतळावरचे फोटो व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये भारतीय महिला क्रिकेट सघांच्या खेळाडू ऑस्ट्रेलियाहून मुंबई विमानतळावर उतरल्या. मात्र त्यांच्या स्वागतासाठी चाहते किंवा इतर कोणी दिसलं नाही. संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमृर्ती, राजश्वरी गायकवाड या भारतात परतल्या. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती.
What if you achieve something big for the first time in history, you get applauded. But i can't see any welcome here. I think the disappointment on the players face is much greater today than the defeat in final. I m with the team #WeAreWithYouTeam 🇮🇳 pc- ig (tag visible) @BCCI pic.twitter.com/4NB02neUYp
— Kp sinha #VK79 (@kpsinha7) March 10, 2020
टीम इंडियाचा फायनलमध्ये पराभव झाला असला तरी त्यांनी जबरदस्त कामगिरी करत तिथपर्यंत वाटचाल केली होती. साखळी फेरीत टीम इंडियाने एकही सामना गमावला नव्हता. या चांगल्या कामगिरीनंतरही चाहत्यांकडून किंवा बीसीसीआयकडून महिला खेळाडूंचे स्वागत करण्यात आलं नाही. यामुळे आता ट्विटरवर चाहत्यांनी बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.
हे वाचा : अजब लॉजिक! विराट-सेहवागमुळे टीम इंडियाचा वर्ल्ड कपमध्ये पराभव
आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला अंतिम सामना भारताने 85 धावांनी गमावला. या पराभवासह पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. तर, ऑस्ट्रेलियानं तब्बल 5 वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रम केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 99 धावांवर ढेपाळला.
हे वाचा : टीम इंडियाला दुखापतीचे ग्रहण! ‘हे’ चार खेळाडू लवकरच घेऊ शकतात निवृत्ती!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket